'मिस्टर इंडिया'तली क्युट 'टीना' आता झालीय मोठी, सिनेइंडस्ट्री सोडून जगतंय असं आयुष्य; ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 02:25 PM2023-03-15T14:25:07+5:302023-03-15T14:30:00+5:30

शेखर कपूर यांच्या 'मिस्टर इंडिया' सिनेमात बालकलाकारांची फौज होती.

Sridevi anil kapoor satish kaushik mr india child artist tina aka dimple girl huzaan khodajiji now looks stunning | 'मिस्टर इंडिया'तली क्युट 'टीना' आता झालीय मोठी, सिनेइंडस्ट्री सोडून जगतंय असं आयुष्य; ओळखणंही झालंय कठीण

'मिस्टर इंडिया'तली क्युट 'टीना' आता झालीय मोठी, सिनेइंडस्ट्री सोडून जगतंय असं आयुष्य; ओळखणंही झालंय कठीण

googlenewsNext

सलीम-जावेद लिखित आणि शेखर कपूर दिग्दर्शित 'मिस्टर इंडिया' चित्रपट तुम्हाला आठवत असेल. १९८७ साली आलेल्या या चित्रपटात अनिल कपूर, श्रीदेवी, अमरीश पुरी, सतीश कौशिक यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात लहान मुलांची पात्रेही महत्त्वाची होती. या चित्रपटात 6 वर्षांच्या मुलीने 'टीना'ची भूमिका साकारली होती. डिंपल असलेल्या या मुलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होते. ही मुलगी आता कुठे आहे माहीत आहे का...? 

चित्रपटात आपल्या क्युट स्माईलनं सर्वांची मनं जिंकणाऱ्या 'टीना'चे खरे नाव हुजान खोदैजी (Huzaan Khodajii) आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही डिंपल गर्ल फक्त 6 वर्षांची होती. चित्रपटाच्या एका दृश्यात बॉम्बस्फोट होतो आणि 'टीना'चा मृत्यू होतो. Huzaan Khodaiji ही तिच बालकलाकार आहे जिचा या सिनेमात एका बॉम्बस्फोटात मृत्यू होतो. सिनेमात टीनाने आपल्या निरागपणाने आणि गालावरील डिंपलने सर्वांची मनं जिंकली होती. आता हुजान खोदैजी खूप मोठी आणि तेवढीच ग्लॅमरस झाली आहे. हुजानचा एक लेटेस्ट फोटो समोर आला आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, Huzaan Khodaiji लिंटास नावाच्या एका कंपनीत अॅडव्हरटायजिंग एक्झिक्यूटीव्ह म्हणून काम करत आहे. अर्थातच आता हुजान सिनेमांपासून दूर गेली आहे. पण तिच्या जादुई स्माइलने लोकांना आजही भुरळ घातली आहे.आता हुजान खूप मोठी झाली आहे आणि तिचा लुकही बदलला आहे.

हुजान आज ४१ वर्षांची झाली आहे आणि दोन मुलींची आई आहे. मिस्टर इंडियात काम केलं तेव्हा ती केवळ ६ वर्षांची होती.  बहुतांश बाल कलाकारांप्रमाणे हुजाननेही इंडस्ट्रीला रामराम केला आहे. 
 

Web Title: Sridevi anil kapoor satish kaushik mr india child artist tina aka dimple girl huzaan khodajiji now looks stunning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.