Sridevi Death Anniversary: पाहा, श्रीदेवींचे काही दुर्मिळ फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 10:50 AM2019-02-24T10:50:55+5:302019-02-24T10:51:24+5:30

आज श्रीदेवींच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे काही दुर्मिळ फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

sridevi death anniversary with unseen and rare photos | Sridevi Death Anniversary: पाहा, श्रीदेवींचे काही दुर्मिळ फोटो!!

Sridevi Death Anniversary: पाहा, श्रीदेवींचे काही दुर्मिळ फोटो!!

googlenewsNext

 गतवर्षी २४ फेब्रुवारीला श्रीदेवींनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी आली आणि अख्खा देश गहिवरला. आज श्रीदेवींच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे काही दुर्मिळ फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

श्रीदेवींनी केवळ वयाच्या चौथ्या वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते Thirumugham’s Thunaivan. १९६९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात त्या बालकलाकार म्हणून दिसल्या होत्या. या फोटोत श्रीदेवी आपल्या वडिलांसोबत दिसताहेत.

श्रीदेवींचे खरे नाव श्री अम्मा यंगर अय्यप्पन होते. पण कालांतराने चित्रपटांसाठी त्यांचे नाव बदलून श्रीदेवी ठेवण्यात आले.  त्यांच्या बालपणीच्या अल्बममधून घेतलेला हा आणखी क्यूट फोटो.

श्रीदेवींनी अनिल कपूरसोबत १३ चित्रपटांत काम केले. जितेन्द्र यांच्यासोबत १६ चित्रपटांत काम केले. श्रीदेवीने अनिल कपूरचा मोठा भाऊ बोनी कपूरसोबत लग्न केले आणि अनिल कपूर श्रीदेवींचा दीर बनला. श्रीदेवींचा जितेन्द्र यांच्यासोबतचा  हा फोटोही एक यादगार फोटो आहे.

श्रीदेवींनी हिंदीप्रमाणेच तामिळ चित्रपटांतही काम केले. कमल हासन यांच्यासोबत त्यांनी सर्वाधिक तामिळ चित्रपटात काम केले. तब्बल १६ चित्रपटांत श्रीदेवी व कमल हासन यांची जोडी दिसली.

श्रीदेवींनी वयाच्या १३ व्य वर्षी आईची भूमिका साकारली होती. यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. एका तामिळ चित्रपटात त्यांनी रजनीकांत यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती.  

श्रीदेवी करिअरच्या शिखरावर असताना स्टीफन स्पीलबर्ग त्यांना ज्युरासिक पार्कसाठी कास्ट करू इच्छित होता. पण श्रीदेवींनी भूमिका आवडली नसल्याचे कारण देत या चित्रपटाला नकार दिला होता.

श्रीदेवींनी सुमारे ३०० चित्रपटांत काम केले. पण अनेक चित्रपट त्यांनी सोडलेही. १९९२ मध्ये आलेला ‘बेटा’ हा चित्रपट सर्वप्रथम श्रीदेवींना आॅफर केला गेला होता. पण त्यांनी या नकार दिला. शाहरूख खानचा ‘डर’ हा चित्रपटही त्यांना आॅफर केला गेला होता.

Web Title: sridevi death anniversary with unseen and rare photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.