Shocking! समोर आलं श्रीदेवीच्या मृत्यूचं खरं कारण, शेवटच्या क्षणी शरीरातील या भागातून वाहत होते रक्त?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 05:35 PM2020-01-04T17:35:39+5:302020-01-04T17:36:13+5:30

तब्बल २ वर्षांनी श्रीदेवीच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे.

Sridevi Death Reason Was Revealed Her Mysterious Death Had Left Many Questions Unanswered | Shocking! समोर आलं श्रीदेवीच्या मृत्यूचं खरं कारण, शेवटच्या क्षणी शरीरातील या भागातून वाहत होते रक्त?

Shocking! समोर आलं श्रीदेवीच्या मृत्यूचं खरं कारण, शेवटच्या क्षणी शरीरातील या भागातून वाहत होते रक्त?

googlenewsNext

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचे बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. मात्र ती कशी बुडली याचं कारण समोर आलं नव्हतं. मात्र आता तिच्या मृत्यूमागचं आणखीन एक कारण समोर आलं आहे. श्रीदेवीच्या जीवनावर आधारीत 'श्रीदेवी : द एटर्नल गॉडेस' हे पुस्तक लिहिणारे लेखक सत्यार्थ नायक यांनी याबाबत नुकताच खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, श्रीदेवी लो ब्लड प्रेशरमुळे बऱ्याचदा बेशुद्ध पडायची. ही बाब ज्यांना माहित होतं अशा व्यक्तीच्या म्हणण्याचादेखील त्यांनी उल्लेख केला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी झालेल्या मुलाखतीत नायक यांनी सांगितलं की, मी पंकज पाराशर (चालबाजचे दिग्दर्शक) व नागार्जुनला भेटलो. त्या दोघांनी मला सांगितलं की तिला रक्तदाबाची समस्या होती. जेव्हा ते दोघे तिच्यासोबत काम करत होते. त्यावेळी ती बऱ्याचदा बाथरूममध्ये बेशुद्ध झाली होती. मग मी याप्रकरणी श्रीदेवीची भाची माहेश्वरीला भेटलो. तिनेदेखील मला तेच सांगितले की, तिने श्रीजीला बाथरूमच्या लादीवर पडलेले पाहिले होते आणि तिच्या चेहऱ्यातून रक्त वाहत होते. 
बोनी सरांनीदेखील मला सांगितले की, एक दिवस चालताना श्रीजी अचानक पडली. जसे की मी सांगितले की तिला कमी रक्तदाबाचा त्रास होता. 


यापूर्वी केरळच्या एका पोलिस महासंचालक ऋषीराज सिंह यांनी शंका उपस्थित केली होती. ते म्हणाले होते की, श्रीदेवीचा मृत्यू अपघात नसून हत्या होती. २४ फेब्रुवारी, २०१८ साली श्रीदेवीचे निधन झाले.

अचानक झालेल्या निधनामुळे लोकांना धक्का बसला होता.

Web Title: Sridevi Death Reason Was Revealed Her Mysterious Death Had Left Many Questions Unanswered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.