युजरने म्हटले अपशकुनी! प्रिया आनंदने दिले खरमरीत उत्तर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 10:43 AM2019-04-23T10:43:47+5:302019-04-23T10:45:12+5:30
सोशल मीडियावर कोण, कशापद्धतीने ट्रोल होईल सांगता येत नाही. अनेकदा सेलिब्रिटी अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. पण क्वचित प्रसंगी त्यांनाही उत्तर द्यावेच लागते. असेच काही घडले ते अभिनेत्री प्रिया आनंद हिच्याबद्दल.
सोशल मीडियावर कोण, कशापद्धतीने ट्रोल होईल सांगता येत नाही. अनेकदा सेलिब्रिटी अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. पण क्वचित प्रसंगी त्यांनाही उत्तर द्यावेच लागते. असेच काही घडले ते अभिनेत्री प्रिया आनंद हिच्याबद्दल. होय, ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात प्रिया आनंद श्रीदेवींसोबत झकळली होती. याच चित्रपटामुळे आपण एकदिवस ट्रोल होऊ असा विचारही प्रियाने केला नव्हता. पण एका युजर्सने तिला टॅग करत ट्रोल केले.
होय, एका युजरने प्रियाला टॅग करत अपशकुनी म्हटले. ‘श्रीदेवींनी प्रिया आनंदसोबत काम केले आणि त्यांचे निधन झाले. जेके रितेश यानेही प्रियासोबत ‘एलकेजी’मध्ये काम केले आणि त्याचेही निधन झाले. जो कुणी प्रिया आनंदसोबत काम करतो, तो जीवाने जातो? काय प्रिया आनंद अपशकुनी आहे? ’, असे एक शॉकिंग ट्वीट या युजरने केले.
त्याचे हे ट्वीट अर्थातच प्रिया आनंदच्या नजरेतून सुटले नाही. तिने ते वाचले आणि ती प्रचंड संतापली. तिने या युजरला खरमरीत उत्तर दिले. इतके की, युजरला तिची माफी मागावी लागली.
I usually don't respond to people like you. But I just want to let you know that it is a very insensitive thing to say. I get that its easy to get away sounding dumb on social media but you my friend have it an all time low! I'm not going to respond by bringing you down...
— Priya Anand (@PriyaAnand) 21 अप्रैल 2019
‘मी तुझ्यासारख्या लोकांना खरे तर उत्तर देत नाही. पण मी तुला सांगू इच्छिते की, तू जे काही बोललास ते अतिसंवेदनशील आहे. स्वत:ला मुर्ख भासवून, सोशल मीडियावर काहीही बरळून स्वत:चा बचाव करता येतो, हे मला ठाऊक आहे. पण माझ्या मित्रा, तू तर इतकी खालची पातळी गाठलीस. मी तुला तुझी लायकी दाखवून उत्तर देऊ इच्छित नाही,’असे तिने या युजरला सुनावले.
I am very sorry. I accept my mistake. I apologize. Today I was watching both of ur films LKG & ENGLISH VINGLISH. U r the common factor in both the films and such a question popped up. So I tweeted just like that. I thought u will never read tweets. Sorry to hurt u.
— Aanalagan (@lovel0velove143) 21 अप्रैल 2019
तिच्या या उत्तरानंतर अनेक लोकांनी तिची बाजू उचलून धरली. मग काय, प्रिया आनंदला अपशकुनी म्हणणाऱ्या युजरला माफी मागावी लागली. मी माफी मागतो. मी माझी चूक स्वीकारतो. मी आज ‘इंग्लिश विंग्लिश’ आणि ‘एलकेजी’ हे दोन सिनेमे पाहत होतो. या दोन्हीत तू आहेस. म्हणून अचानक माझ्या डोक्यात हा विचार आला आणि मी ते टिष्ट्वटरवर लिहिले. तू माझे ट्वीट वाचलीस, असे मला वाचले नव्हते. मी केवळ माफी मागतो, असे त्याने लिहिले.