थिएटर्सनंतर घरबसल्या पाहता येणार 'श्रीकांत' चित्रपट; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 02:50 PM2024-05-22T14:50:29+5:302024-05-22T14:52:11+5:30
राजकुमार रावचा 'श्रीकांत' हा चित्रपट कोणत्यातरी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता राजकुमार राव सध्या 'श्रीकांत' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिनेमातील अभिनेत्याचा अभिनय आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडली आहे. या सिनेमातून एका हरहुन्नरी अंध व्यक्तीची गोष्ट मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. अंधत्वावर मात करुन उद्योगपती झालेल्या श्रीकांत बोल्ला यांची प्रेरणादायी कथा या सिनेमातून दाखविण्यात आली आहे. आता हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, याबाबत अपडेट समोर आलं आहे.
राजकुमार रावचा 'श्रीकांत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे. चित्रपटातील स्टारकास्टचा अभिनय आणि कथेने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. त्यामुळे श्रीकांतला चाहत्यांकडून आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. 'श्रीकांत'च्या ओटीटी रिलीजबाबत चर्चा सुरू झाली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे डिजिटल अधिकार प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix ला विकले आहेत. ज्यावरून हे स्पष्ट होते की 'श्रीकांत' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
सिनेमाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. अंदाजे 2 महिन्यांनंतर तो OTT वर लॉन्च केला जाऊ शकतो. 'श्रीकांत' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अप्रतिम कामगिरी केली आहे. राजकुमार राव, ज्योतिका आणि शरद केळकर यांच्या या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 27 कोटींचा व्यवसाय केला असून, येत्या काही दिवसांत हा कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.