What! कतरिना कैफची बहीण इसाबेलला मिळाली आली होती RRRची ऑफर, पण तिची एक चूक नडली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 04:24 PM2022-03-30T16:24:49+5:302022-03-30T19:36:28+5:30
RRR चं यश बघून आता इसाबेलच्या हाती आता पश्चाताप करण्याशिवाय काही नाही. इसाबेलला ऑफर करण्यात आलेली भूमिका आलिया भटपेक्षा ही मोठी होती.
कतरिना कैफ (Katrina Kaif)ची बहीण इसाबेल कैफ (Isabelle Kaif) दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपड करतेय. पण तुम्हाला माहिती आहे का, इसाबेलला दिग्दर्शक एसएस राजामौली (S. S. Rajamouli)यांच्या 'RRR' चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. पण इसाबेलने दिग्दर्शकासमोर अशी अट ठेवली की राजामौली ती पूर्ण करू शकले नाहीत आणि अभिनेत्रीने चित्रपट सोडला. या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (RRR Box Office Collection) बघून आता इसाबेलला नक्कीच पश्चाताप झाला असेल.
अशी बातमी समोर येत आहे की, जेव्हा दिग्दर्शक राजामौली यांनी इसाबेलला त्यांच्या 'RRR' चित्रपटात जेनीची भूमिका ऑफर केली होती. चित्रपटात जेनी ही इंग्लिश स्त्री दाखवण्यात आली आहे, जिचा ज्युनियर एनटीआरसोबत रोमान्स आहे. चित्रपटातील आलिया भटच्या भूमिकेपेक्षा जेनीचे पात्र मोठे आहे.
राजामौली यांनी जेव्हा इसाबेलला त्यांच्या 'RRR' चित्रपटात जेनीची भूमिका साकारण्याची ऑफर दिली तेव्हा अभिनेत्रीने तिची अट दिग्दर्शकासमोर ठेवली. वास्तविक, इसाबेलला चित्रपटाला हो म्हणण्यापूर्वी स्क्रिप्ट वाचायची होती. पण आपल्या कथेचा कुठलाही भाग लीक होऊ नये अशी इच्छा असलेल्या राजामौलींनी ही अट मान्य करण्यास नकार दिला. मग काय, इसाबेलने ही ऑफर नाकारली.
Thanks to EVERRRYONE for your thunderous applause for #RRRMovie. Overwhelmed 🤗🙏🏻
— rajamouli ss (@ssrajamouli) March 26, 2022
खरे तर राजामौलींची ही शैली आहे की ते संपूर्ण स्क्रिप्ट आपल्या कलाकारांना देत नाहीत. खरं तर, चित्रपटाचा क्लायमॅक्स लीक होऊ नये म्हणून तो त्याची कथा अगदी व्यवस्थित ठेवतात. कदाचित त्यामुळेच राजामौलींच्या कथा हेच त्यांचे खरे नायक आहेत.
केवळ जेनीच्याच नव्हे तर आलिया भटच्या सीतेच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींनाही अप्रोच करण्यात आले होते. यामध्ये परिणीती चोप्रा आणि श्रद्धा कपूर यांचाही समावेश आहे, पण त्यांच्याच कारणांमुळे या चित्रपटांनी हा चित्रपट नाकारला.