“आमिर खानने ओव्हरअ‍ॅक्टिंग केली”, ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर राजामौलींनी दिलेली प्रतिक्रिया, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 12:16 PM2023-08-19T12:16:47+5:302023-08-19T12:17:17+5:30

आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' राजामौलींनाही आवडला नव्हता. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत प्रसिद्ध दिग्दर्शकाने खुलासा केला आहे.

ss rajamouli said amir khan did overacting after watching laal singh chaddha movie revealed mansoor khan | “आमिर खानने ओव्हरअ‍ॅक्टिंग केली”, ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर राजामौलींनी दिलेली प्रतिक्रिया, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

“आमिर खानने ओव्हरअ‍ॅक्टिंग केली”, ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर राजामौलींनी दिलेली प्रतिक्रिया, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

googlenewsNext

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत होता. २०२२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडून आमिरच्या चाहत्यांनाही खूप अपेक्षा होत्या. परंतु, प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा न उतरल्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही आपटला. या चित्रपटात आमिर खाननेलाल सिंग चड्ढा’ ही भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री करीना कपूर मुख्य नायिकेच्या भूमिकेत होती. आमिर खानचा हा चित्रपट सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक राजामौली यांनीही पाहिला होता. परंतु, ‘लाल सिंग चड्ढा’ राजामौलींनाही फारसा रुचला नाही. आमिर खानचा भाऊ आणि दिग्दर्शक मंसूर खान यांनी याचा खुलासा केला आहे.

मंसूर यांनी 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’बाबत भाष्य केलं. ते म्हणाले, “’लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर राजामौलींनी मला फोन केला होता. आमिर खानने ओव्हरअ‍ॅक्टिंग केली आहे, असं ते मला म्हणाले होते. त्यानंतर काहीतरी गडबड नक्कीच झाली असेल, हे मला जाणवलं. एक दिवस आमिर मला हसत हसत मी ओव्हरअ‍ॅक्टिंग केली, हे तू मला कधी सांगणार होतास, असं म्हणाला.” राजामौलींच्या या वक्तव्यानंतर आमिरची काय प्रतिक्रिया होती, याबाबत मंसूर यांनी खुलासा केला.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचं अवघ्या २५ वर्षी निधन, कार्डियक अरेस्टमुळे गमावला जीव

“जेव्हा तू मला सांगितलंस की मी ओव्हरअ‍ॅक्टिंग केली आहे. तेव्हा मला वाटलं, हा एक साधा मनुष्य आहे. त्यामुळे त्याला तसं वाटलं असेल. पण जर राजामौली सर म्हणत आहेत, तर मग मी नक्कीच ओव्हरअ‍ॅक्टिंग केली असेल,” राजामौलींची लाल सिंग चड्ढाबाबत प्रतिक्रिया ऐकल्यानंतर असं आमिर खान मंसूर यांना म्हणाला होता.

मंसूर खान पुढे म्हणाले, “मला चित्रपटाची कथा आवडली होती. अतुल कुलकर्णींनी चांगलं काम केलं आहे. पण, आमिरचे खूप जास्त अभिनय केला, हे मलाही जाणवलं होतं. पण, चित्रपटातील आमिरची व्यक्तिरेखा वाईट नव्हती. तो डिस्लेक्सियाने पीडितही नव्हता. मला टॉम हँक यांचा 'फॉरेस्ट गंप' खूप आवडला होता. त्यांनी अभिनयही उत्तम केला होता. मी हे आमिरलाही सांगितलं होतं.” आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूरसह मोना सिंह, नागा चैतन्य या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

 

Web Title: ss rajamouli said amir khan did overacting after watching laal singh chaddha movie revealed mansoor khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.