एसएस राजमौली यांच्या 'आरआरआर'मध्ये दिसणार ही तगडी स्टारकास्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 04:59 PM2021-11-01T16:59:35+5:302021-11-01T17:00:41+5:30

आरआरआर हा बाहुबलीपेक्षा मोठा चित्रपट मानला जात आहे ज्याला रिलीजपूर्वीच जास्त प्रसिद्धी मिळत आहे.

SS Rajmouli's 'RRR' will see this strong star cast | एसएस राजमौली यांच्या 'आरआरआर'मध्ये दिसणार ही तगडी स्टारकास्ट

एसएस राजमौली यांच्या 'आरआरआर'मध्ये दिसणार ही तगडी स्टारकास्ट

googlenewsNext

२०२२ हे वर्ष, प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजमौली दिग्दर्शित सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर, 'आरआरआर'ने सुरू होण्यासाठी सज्ज झाले आहे. या चित्रपटात अनेक उद्योगातील बडी नावे एकत्र दिसणार असून हा चित्रपट बाहुबली फ्रँचायझीपेक्षा मोठा प्रकल्प बनण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, निर्मात्यांनी अजय देवगण, आलिया भट्ट, जूनियर एनटीआर आणि राम चरण अभिनीत चित्रपटाची खास झलक सादर करण्याची योजना आखली आहे.

हा चित्रपट दृश्यात्मकदृष्ट्या भव्य आणि आकर्षक झाला असून स्वातंत्र्यपूर्व भारतावर बेतलेला आहे, हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामराजू यांच्या तरुणपणातील दिवसांवर आधारित एक काल्पनिक कथा आहे, जे अनुक्रमे जूनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. चित्रपटाविषयीची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच, चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शनाआधीच या प्रकारची पहिली-वहिली भागीदारी प्रसिद्ध केली आहे. भारतातील सर्वात मोठी थिएटर साखळी, पीव्हीआर आता पीव्हीआरआरआर म्हणून ओळखली जाणार असल्याची घोषणा अलीकडेच करण्यात आली असून त्यासाठी दोन्ही दिग्गजांनी एकत्र सहकार्य करार केला आहे.

आरआरआर हा बाहुबलीपेक्षा मोठा चित्रपट
बहुमुखी एसएस राजमौली त्यांच्या बहुप्रशंसित बाहुबली फ्रँचायझीनंतर दिग्दर्शनाकडे परत येत आहेत. एवढेच नाही तर सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आरआरआर हा बाहुबलीपेक्षा मोठा चित्रपट मानला जात आहे ज्याला रिलीजपूर्वीच मोठ्या प्रमाणात प्रेम आणि प्रसिद्धी मिळत आहे. भारतातील या सर्वात मोठ्या मल्टीस्टाररमध्ये अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्यासह राम चरण, एनटीआर जूनियर आहेत. हा चित्रपट एसएस राजामौली यांनी दिग्दर्शित केला आहे, जो रेकॉर्डब्रेक बाहुबली मालिकेचे मास्टरमाइंड देखील होता.

'आरआरआर' ७ जानेवारी, २०२२ ला होणार प्रदर्शित

पेन स्टुडिओने संपूर्ण उत्तर भारतातील  थिएटर्स वितरणाचे हक्क संपादित केले असून सर्व भाषांसाठी जगभरातील इलेक्ट्रॉनिक हक्क देखील विकत घेतले आहेत. पेन मरुधर या चित्रपटाचे उत्तर प्रदेशात वितरण करणार आहे. 'आरआरआर' ७ जानेवारी, २०२२ ला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: SS Rajmouli's 'RRR' will see this strong star cast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.