स्टाईल में रहने का...!

By Admin | Published: May 26, 2016 02:50 AM2016-05-26T02:50:57+5:302016-05-26T02:50:57+5:30

बॉलीवूडमधले अभिनेते-अभिनेत्री स्टायलिश राहण्यासाठी नेहमीच आपल्या लूकमध्ये काही ना काही बदल करत असतात. केस वाढवण्याची स्टाईल अभिनेत्यांमध्ये नेहमीच पाहायला मिळते.

Stay in style ...! | स्टाईल में रहने का...!

स्टाईल में रहने का...!

googlenewsNext

बॉलीवूडमधले अभिनेते-अभिनेत्री स्टायलिश राहण्यासाठी नेहमीच आपल्या लूकमध्ये काही ना काही बदल करत असतात. केस वाढवण्याची स्टाईल अभिनेत्यांमध्ये नेहमीच पाहायला मिळते. पण त्याच केसांचा पोनी बांधण्याची स्टाईल बॉलीवूडमध्ये गेल्या पाच-सात वर्षांमध्ये अधिक दिसू लागली आहे. डॉन- 2 या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान शाहरूख अनेक वेळा पोनीत पाहायला मिळाला होता. शाहरूखने पोनी घालण्याचा ट्रेंड बॉलीवूडमध्ये आणला होता. सध्याच्या अभिनेत्यांना पाहता हा पोनी घालण्याचा ट्रेंड बॉलीवूडमध्ये चांगलाच रुजू लागला आहे, असे म्हणावे लागेल.

रितेश देशमुख
रितेश देशमुख बँजो या चित्रपटात बँडमध्ये वाद्य वाजवणाऱ्या मुलाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटासाठी त्याने खांद्यापर्यंत केस वाढवलेले आहेत. या उन्हाळ्यात खांद्यापर्यंतचे केस सांभाळणे खूपच कठीण जाते. त्यामुळे बहुधा रितेश आजकाल सगळ्या पार्टींमध्ये पोनी घालतो. एवढंच नव्हे तर त्याने त्याचे समोरचे केस अतिशय कमी केले आहेत. तसेच दाढीही वाढवली आहे. रितेश नेहमीच क्लीन शेव्हमध्ये आणि छोट्या केसांमध्ये दिसायचा. पण पहिल्यांदाच रितेशचा हा वेगळा लूक लोकांना पाहायला मिळत आहे.

इरफान खान
अभिनेता इरफान खानने मदारी या त्याच्या आगामी चित्रपटासाठी केस वाढवले आहेत. त्यामुळे तोही सध्या पोनी लूकमध्ये पाहायला मिळत आहे. इरफानचा हा लूक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

आर. माधवन
आर. माधवनने साला खडूस या चित्रपटापासून त्याचा लूक खूप बदलला आहे. आर.माधवन हा चॉकलेट हीरो म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्याने कधी त्याच्या लूकच्या बाबतीत प्रयोग केले नव्हते. पण साला खडूस या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळाच माधवन पाहायला मिळाला आणि प्रेक्षकांना त्याचा हा नवा लूक आवडलादेखील होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही त्याने आपला हा लूक कायम ठेवला आहे. तो अनेक ठिकाणी पोनीमध्येच पाहायला मिळतो.

जॅकी भगनानी
अभिनेता जॅकी भगनानीनेदेखील आपला लूक बदलला आहे. सध्या तोदेखील पोनी लूकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.

- prajakta.chitnis@lokmat.com

Web Title: Stay in style ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.