मुलीच्या पावलावर पाऊल
By Admin | Published: July 6, 2015 02:48 AM2015-07-06T02:48:28+5:302015-07-06T02:48:28+5:30
चित्रपटसृष्टीमध्ये आई किंवा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांच्या मुलांनी या क्षेत्रात काम केल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे. पण याला
चित्रपटसृष्टीमध्ये आई किंवा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांच्या मुलांनी या क्षेत्रात काम केल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे. पण याला अपवाद ठरली आहे सगळ्या तरुणाईला वेड लावणारी सई ताम्हणकरची आई... मृणालिनी ताम्हणकर. हो, हे खरं आहे. येत्या एका चित्रपटामध्ये स्वप्नील जोशीच्या आईची भूमिका मृणालिनी ताम्हणकर साकारणार आहेत आणि अर्थात त्यामध्ये सईसुद्धा लीड भूमिकेमध्ये असणार हे वेगळं सांगायला नकोच. यामुळे आई-मुलीला एकत्र पाहणे, ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. मृणालिनी ताम्हणकर सांगतात, की मुलगी आईच्या पावलावर पाऊल टाकणं हे नॉर्मल आहे. पण कधीतरी नियम मोडण्यातच खरा वेगळेपणा असतो आणि मजाही. संजय जाधव आणि सईने मला जितक्या सहज विचारलं तितक्याच सहज मी ‘हो’ म्हणले आणि शूट झालंसुद्धा. माझी भूमिका एक मिनिटाचीच असली तरी काम केल्यानंतर समजलं की कॅमेऱ्यासमोर अभिनय करणं पोऱ्यासोऱ्याचं नाही. पण पुढे चित्रपटात काम करायचा चान्स मिळाला तर मला नक्कीच आवडेल.