...तरीही ‘हॉलीवूड’मध्ये एस्टाब्लिश व्हायचे नाही - मंगेश देसाई

By Admin | Published: October 25, 2015 02:51 AM2015-10-25T02:51:01+5:302015-10-25T02:51:01+5:30

खेळ मांडला’, ‘बायोस्कोप’, ‘नीळकंठ मास्तर’ यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांबरोबरच ‘फू बाई फू’ सारख्या कॉमेडी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले एक नाव

... Still do not want to be Establish in 'Hollywood' - Mangesh Desai | ...तरीही ‘हॉलीवूड’मध्ये एस्टाब्लिश व्हायचे नाही - मंगेश देसाई

...तरीही ‘हॉलीवूड’मध्ये एस्टाब्लिश व्हायचे नाही - मंगेश देसाई

googlenewsNext


‘खेळ मांडला’, ‘बायोस्कोप’, ‘नीळकंठ मास्तर’ यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांबरोबरच ‘फू बाई फू’ सारख्या कॉमेडी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले एक नाव म्हणजे मंगेश देसाई. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर एक प्रतिभावंत कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. मराठी इंडस्ट्रीमध्ये अगदी बोटावर मोजण्याइतकेच कलाकार सापडतील ज्यांना हॉलिवूडमध्ये झळकण्याची संधी मिळाली. त्या यादीमध्ये आता मंगेश देसाई यांच्यासारख्या एका गुणवान कलाकाराची भर पडली आहे. साऊथ आफ्रिकेच्या सल्लास डी जागर दिग्दर्शित ‘फ्री स्टेट’ या हॉलिवूड चित्रपटामध्ये त्यांनी यशस्वी ‘एंट्री’ केली आहे. या चित्रपटाचे अनुभव त्यांनी ‘सीएनएक्सशी’ शेअर केले.

मराठीमधून एकदम हॉलिवूडमध्ये ‘एंट्री’ कशी झाली?
साऊथ आफ्रिकेमधील चित्रपट महोत्सवामध्ये ‘खेळ मांडला’ हा चित्रपट दाखविण्यात आला होता. तो चित्रपट पाहून दिग्दर्शक सल्लास डी जागर माझ्याशी अ‍ॅप्रोच झाले. या ठिकाणी राजू तेरवाडकर हे स्थायिक झाले असल्याने त्यांची भेट झाली. तेव्हा ‘फ्री स्टेट’ या चित्रपटासाठी मला विचारणा झाली. पण माझा इंग्रजीचा प्रॉब्लेम होता. तो देखील त्यांनी स्वीकारून माझ्यासाठी ट्यूटर ठेवण्याची तयारी दर्शविली. फेब्रुवारीमध्ये १२ दिवस जोहन्सबर्गला राहून चित्रपटाचे शूटिंग मी पूर्ण केले. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘फ्री स्टेट’ या चित्रपटातील तुमची भूमिका काय आहे?
ही एक लव्ह स्टोरी आहे. यात एका निगेटिव्ह भूमिकेमध्ये मी आहे. बहिण आत्महत्या करते आणि त्याचा बदला मी घेतो.
हॉलिवूडचा अनुभव कसा होता?
अनुभव खूपच वेगळा होता. तिकडे ‘सिनेमा’ला खूप महत्त्व आहे. अगदी छोट्या गोष्टींचे प्लॅनिंग कसे करावे, हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. ‘वेळ’ ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आश्चर्य वाटेल पण
मला सेटवर नेण्यासाठी पहाटे ५ वाजता गाडी यायची, साधारणपणे ९ वाजता माझे पॅकअप व्हायचे. पण जर तुम्हाला सेटवरच थांबायचे असेल तर ते तुमच्या जबाबदारीवर थांबायचे.
आमच्याकडे लक्षच दिले गेले नाही, रूसवे-फुगवे अशा गोष्टी तिथे चालायच्या नाहीत. इतकी कडक शिस्त तिथे पाळली जायची.
उद्या जर आपला सीन असेल तर तो कुणाबरोबर आहे, गाडी किती वाजता
न्यायला येईल, याची फाईल आदल्या दिवशी रात्रीच आपल्या रूमवर आणून दिली जात असे. इतके परफेक्शन त्यांच्या कामात पाहायला मिळाले.
हॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर मराठीत कोणते बदल होण्याची गरज भासते?
मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार भरारी घेतली असली तरी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ‘प्रोफेशनॅलिझम’ची कमतरता जाणवते.
एखादा निर्माता किंवा दिग्दर्शक कलाकाराचा मित्र असेल तर प्लीज मैत्रीसाठी कर ना, असे सांगून कमी पैशांत काम करून घेतले जाते. जर दिग्दर्शक किंवा कलाकार यांनी शूटिंगच्या वेळा पाळल्या तर इंडस्ट्रीचा निम्म्याहून अधिक खर्च वाचू शकेल. पण हे होणे स्वप्नवतच!
या चित्रपटानंतर हॉलिवूड चित्रपटांच्या आणखी काही आॅफर्स आल्या का?
हो, पॉल इयीस या दिग्दर्शकाचा मला
फोन आला होता. त्यांना या चित्रपटामधले
माझे काम खूप आवडले. तुला खूप चांगल्या आॅफर्स येतील. मला तू जून आणि जुलैच्या तारखा दे. मे महिना इथे येऊन राहा.. पण मी त्यांना विचार करून सांगतो, असे म्हटले.
जून महिन्यामध्ये कमिटमेंट आहेत...असे त्यांना सांगितले...मात्र ते प्रोजेक्ट लांबणीवरच पडले. हॉलिवूडमध्ये वर्षाला एक चित्रपट प्रदर्शित होतो, पण मराठीमध्ये वर्षाला १०० चित्रपट प्रदर्शित होतात. त्यामुळे मराठी सोडून हॉलिवूडमध्ये एस्टाब्लिश व्हावेसे वाटत नाही. आपल्या मातीशी अंतर करायचे नाही..
हे मी मनाशी पक्के ठरविले आहे. त्याच दिशेने मी मार्गक्रमण करणार आहे.

- namrata.phadnis@lokmat.com

Web Title: ... Still do not want to be Establish in 'Hollywood' - Mangesh Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.