'वीकेंडची वाट पाहणे अन् सोमवारची तक्रार थांबवा, आपण आळशी होऊ शकत नाही', कंगना रणौतचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 06:37 AM2024-06-12T06:37:28+5:302024-06-12T06:37:47+5:30

Kangana Ranaut: स्वतःला कामात व्यस्त ठेवण्याच्या प्रवृत्तीला, सामान्य करण्याच्या गरजेवर भर दिला गेला पाहिजे, कारण भारतीय लोक आळशी होऊ शकत नाहीत, कारण देश अजून एक विकसित राष्ट्र झालेले नाही, कंगनाने इन्स्टाग्रामवर मंगळवारी यासंदर्भात तिचे हे विचार प्रस्तुत केले.  

'Stop waiting for the weekend and complaining about Monday, you can't be lazy', says Kangana Ranaut | 'वीकेंडची वाट पाहणे अन् सोमवारची तक्रार थांबवा, आपण आळशी होऊ शकत नाही', कंगना रणौतचं मत

'वीकेंडची वाट पाहणे अन् सोमवारची तक्रार थांबवा, आपण आळशी होऊ शकत नाही', कंगना रणौतचं मत

 नवी दिल्ली - आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आणि सत्ताधारी भाजप पक्षाची नवनिर्वाचित लोकसभा खासदार कंगना रणौतने एक सामाजिक संदेश देत म्हटले की, स्वतःला कामात व्यस्त ठेवण्याच्या प्रवृत्तीला, सामान्य करण्याच्या गरजेवर भर दिला गेला पाहिजे, कारण भारतीय लोक आळशी होऊ शकत नाहीत, कारण देश अजून एक विकसित राष्ट्र झालेले नाही.

कंगनाने इन्स्टाग्रामवर मंगळवारी यासंदर्भात तिचे विचार प्रस्तुत केले.  ज्यामध्ये तिने केंद्रात तिसरा कार्यकाळ सुरू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमओ कर्मचाऱ्यांना केलेल्या संबोधनाचे व्हिडीओ पोस्ट केले. 

पाश्चात्त्य मानसिकता
कंगनाने म्हटले की, वीकेंड ही संकल्पना पाश्चात्त्य मानसिकतेशिवाय दुसरे काही नाही. आपल्याला कामात व्यस्त राहण्याच्या संस्कृतीला सामान्य करावे लागेल, आणि वीकेंडची वाट पाहणे आणि सोमवारबद्दल तक्रार करणे थांबवावे लागेल. वीकेंड हा सगळा पाश्चात्त्य मानसिकता असलेल्या लोकांचा खोटारडेपणा आहे. आपण अजून एक विकसित राष्ट्र नाही, आणि आपण कामात अजिबात आळशी होऊ शकत नाही, असे ती पोस्टमध्ये म्हणाली आहे.

Web Title: 'Stop waiting for the weekend and complaining about Monday, you can't be lazy', says Kangana Ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.