अभिजीत राजे म्हणजेच गिरीश ओक यांच्या दुसऱ्या लग्नांची गोष्ट!, त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीदेखील आहे सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 06:00 AM2021-07-07T06:00:00+5:302021-07-07T06:00:00+5:30

सध्या 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेत डॉ. गिरीश ओक साकारत असलेल्या अभिजीतलादेखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

The story of Abhijeet Raje's second marriage in 'Aggambai Sunbai', his real life wife is also beautiful | अभिजीत राजे म्हणजेच गिरीश ओक यांच्या दुसऱ्या लग्नांची गोष्ट!, त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीदेखील आहे सुंदर

अभिजीत राजे म्हणजेच गिरीश ओक यांच्या दुसऱ्या लग्नांची गोष्ट!, त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीदेखील आहे सुंदर

googlenewsNext

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेनंतर अग्गंबाई सूनबाई मालिकेला कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील अभिजीत राजे आणि आसावरी, शुभ्रा आणि सोहम या पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अभिजीत राजेंची भूमिका साकारली आहे अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी. गिरीश ओक यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

मुळचे नागपूरचे असलेले डॉ. गिरीश ओक यांनी आयुर्वेद वैद्यकीय कॉलेजमध्ये त्यांनी डॉक्टरकीची डिग्री घेतली. काही वर्षे प्रॅक्टीस केल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा अभिनयाकडे वळवला. मालिका, नाटकांमधून त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यानंतर पद्मश्री पाठक यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर त्यांना गिरीजा ही मुलगी झाली. मात्र काही वर्षानंतर गिरीश आणि पद्मश्री विभक्त झाले. गिरीजा देखील आज मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पद्मश्री यांना घटस्फोट दिल्यानंतर २३ मार्च २००८ रोजी गिरीश यांनी पल्लवी यांच्यासोबत विवाह केला. त्यांना दुर्गा नावाची मुलगी आहे.


गिरीश ओक यांनी सुरुवातीला दूरदर्शनच्या मालिकेत काम केले. मात्र त्यांना ह्या गोजिरवाण्या घरात या मालिकेतून ओळख मिळाली. या मालिकेचे त्यांनी दोन हजार पाचशे एपिसोड्स केले.

'ह्या गोजिरवाण्या घरात', 'पसंत आहे मुलगी', 'आराधना', 'पिंजरा', 'अग्निहोत्र', 'या सुखांनो या', 'अधुरी एक कहाणी', 'अवंतिका', 'निवडुंग', 'दामिनी', 'जुळून येती रेशीमगाठी' यासारख्या अनेक मालिकेत त्यांनी काम केले. सध्या 'अग्गबाई सूनबाई' या मालिकेत साकारत असलेल्या अभिजितलादेखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. 


गिरीश ओक यांनी लक्ष्मीकांत बेर्डेच्या 'आली लहर केला कहर' या सिनेमात एक छोटी भूमिका साकारली होती. पण, ते फार चित्रपटात रमले नाहीत. 'जसा बाप तशी पोरं', 'वाट पाहते पुनवेची', 'शिवरायांची सून ताराराणी', 'लावण्यवती', 'विश्वविनायक', 'सातच्या आत घरात', 'झुळूक', 'आम्ही असू लाडके', 'माझा नवरा तुझी बायको', 'तानी' यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.

Web Title: The story of Abhijeet Raje's second marriage in 'Aggambai Sunbai', his real life wife is also beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.