खूप इंटरेस्टिंग आहे धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 06:49 PM2021-08-26T18:49:59+5:302021-08-26T18:51:02+5:30

'द कपिल शर्मा' शोमध्ये नुकतेच दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी हजेरी लावली आहे.

The story of the first meeting between Dharmendra and Shatrughan Sinha is very interesting, read more | खूप इंटरेस्टिंग आहे धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा, वाचा सविस्तर

खूप इंटरेस्टिंग आहे धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा, वाचा सविस्तर

googlenewsNext

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शोच्या आगामी वीकेंडच्या भागात बॉलिवूडचे दोन ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा उपस्थित असणार आहेत. कपिल शर्मा आणि त्याची टीम त्यांच्या विनोदी संभाषणाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल तर दुसरीकडे हे दोन्ही महान अभिनेते मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या प्रवासातील काही मजेशीर किस्से प्रेक्षकांना सांगतील.

या दोघांशी गप्पा मारताना कपिल शर्माने शत्रुघ्न सिन्हाला त्याच्या आणि धर्मेंद्रच्या पहिल्या भेटीबद्दल विचारले. त्यावर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, “मी धर्मेंद्रजींना पहिल्यांदा फिल्म इंस्टीट्यूटमध्ये भेटलो होतो, ज्यावेळी ते एक व्याख्यान देण्यासाठी तेथे आले होते. त्यांना पाहून माझ्या मनात पहिला विचार हाच आला होता की, ते किती हँडसम आहेत, त्यांचे केस छान आहेत आणि त्यांचे व्यक्तिमत्व अगदी वेधक आहे.”


शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले की, “मला त्यांना काही तरी प्रश्न विचारावा असे वाटत होते, पण काय विचारावे ते कळत नव्हते म्हणून मग मी असेच विचारले की, “धरमजी तुम्ही केसांना कोणते तेल लावता?” त्यावर धरमजींनी उत्तर दिले होते, “मी तेल लावतच नाही.” ते ऐकून तिकडे एकच हास्यस्फोट झाला होता.”


शत्रुघ्न सिन्हाने पुस्ती जोडत म्हटले की, “मी नेहमी मोठ्या भावाप्रमाणे त्यांच्यावर (धर्मेन्द्र) प्रेम केले आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. त्यांची विनोदबुद्धीही अफलातून आहे, जे कदाचित लोकांना माहीत नसेल. आणि जेव्हा कधी त्यांच्यासोबत मी चित्रपट केलेत, तेव्हा सुरूवातीचे ३-४ दिवस या गोष्टीवर माझा विश्वासच बसायचा नाही, की मी धरमजींबरोबर काम करत आहे. धरमजींचे व्यक्तिमत्व, स्वभाव आणि लोकप्रियता पाहून मी आज पुन्हा हेच म्हणू शकतो की, “दम खम वही, चमखम वही, कद-कठ वही है तलवार पुरानी है मगर काट वही है.”


हा भाग द कपिल शर्मा शोमध्ये शनिवारी आणि रविवारी रात्री ९.३० वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पहायला मिळेल.

Web Title: The story of the first meeting between Dharmendra and Shatrughan Sinha is very interesting, read more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.