'तुंबाड २' मध्ये काय असणार कहाणी? निर्माता-अभिनेता सोहम शाह म्हणाला- "यावेळी पांडुरंग..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:03 AM2024-09-17T11:03:38+5:302024-09-17T11:05:18+5:30

'तुंबाड २'ची घोषणा झाल्यावर सोहम शाहने या सिनेमात काय दिसणार हे सांगून टाकलंय (tumbbad)

story in Tumbbad 2 Revealed by producer actor Soham Shah tumbbad re release | 'तुंबाड २' मध्ये काय असणार कहाणी? निर्माता-अभिनेता सोहम शाह म्हणाला- "यावेळी पांडुरंग..."

'तुंबाड २' मध्ये काय असणार कहाणी? निर्माता-अभिनेता सोहम शाह म्हणाला- "यावेळी पांडुरंग..."

'तुंबाड' सिनेमा १३ सप्टेंबरला पुन्हा रिलीज झालाय. या सिनेमाने पुन्हा रिलीज झाल्यावर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीय. 'तुंबाड' पाहण्यासाठी पुन्हा एकदा लोक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. निर्माता-अभिनेता सोहम शाहने 'तुंबाड' पुन्हा एकदा रिलीज करण्याचा घेतलेला निर्णय चांगलाच पथ्यावर पडलेला दिसतोय. 'तुंबाड'ने पुन्हा एकदा बक्कळ कमाई करत प्रेक्षकांचं मन जिंकलंय. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत 'तुंबाड २'मध्ये काय दिसणार, याचा उलगडा सोहम शाहने केलेला दिसतोय. 

'तुंबाड २'मध्ये दिसणार ही कथा

'तुंबाड' पुन्हा रिलीज झाल्यानिमित्त सोहम शाहने विविध ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत. यावेळी 'तुंबाड २'मध्ये काय कथा दिसणार याचा खुलासा सोहम शाहने केलाय. सोहम शाह बिअर बायसेप्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, "तुंबाड २ मध्ये असलेली कथा पांडुरंगाच्या दृष्टीकोनातून घडणार आहे. पांडुरंगचे वडील विनायक यांचा पहिल्या भागाच्या शेवटी मृत्यु होतो. त्यामुळे दुसऱ्या भागाची कथा पांडुरंगची असणार आहे. यावेळीही लोभ, लालच हा कथेचा मुख्य गाभा असणार आहे. पहिल्या भागात सोन्याचा हव्यास होता. दुसऱ्या भागात वेगळ्या गोष्टीचा लोभ दाखवण्यात येणार आहे."

तुंबाडची पुन्हा चर्चा

'तुंबाड' हा गाजलेला हिंदी सिनेमा पुन्हा रिलीज झालाय. २०१८ साली प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा सिनेमा १३ सप्टेंबरला संपूर्ण भारतात पुन्हा रिलीज झालाय. 'तुंबाड' पुन्हा रिलीज होताच सिनेमाने अनपेक्षितरित्या प्रेक्षकांचं हाऊसफुल्ल प्रेम मिळवलंय. जवळपास ८० % थिएटर हाऊसफुल्ल आहेत. सिनेमाने गेल्या चार दिवसात ७ कोटींहून जास्त कमाई केलीय. 

Web Title: story in Tumbbad 2 Revealed by producer actor Soham Shah tumbbad re release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.