‘कापूसकोंड्याची गोष्ट’ आॅस्करसाठी
By Admin | Published: December 19, 2014 10:49 PM2014-12-19T22:49:29+5:302014-12-19T22:49:29+5:30
आॅस्कर पुरस्कारासाठी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या मराठी चित्रपटाचे नामांकन झाले आहे़ कापूसकोंड्याची गोष्ट या चित्रपटात नागपूरमधील छोट्या
आॅस्कर पुरस्कारासाठी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या मराठी चित्रपटाचे नामांकन झाले आहे़ कापूसकोंड्याची गोष्ट या चित्रपटात नागपूरमधील छोट्या गावामधील ४ बहिणींची कथा मांडण्यात आली आहे़ ४५ -४८ अंश डिग्री तापमानात केलेले चित्रिकरण, उन्हाचा त्रास झाल्याने कलाकारांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ अशा अनेक अडचणींना तोंड देत हा चित्रपट तयार झाला आहे़ आॅस्करसाठी निवड होणे हे आमच्या प्रयत्नांचे जागतिक पातळीवर झालेले कौतुकच आहे, असे दिग्दर्शिका मृणालिनी भोसले यांनी सांगितले़ विशेष म्हणजे पुण्याच्या असलेल्या भोसले यांचा हा पहिलाच चित्रपट आहे़ या चित्रपटाचे निर्माते नितीन ऊर्फ रवींद्र भोसले हे असून कार्यकारी निर्माते प्रविण वानखेडे आहेत़ या चित्रपटात ज्योती -समिधा गुरु, मकरंद अनासपुरे व भारत गणेशपुरे यांच्या अप्रतिम अभिनयाने चित्रपटाला वेगळीच उंची गाठून दिली आहे़ चित्रिकरण वसिम मणेर यांचे असून संकलन संतोष गोठोस्कर यांनी केले आहे़ कथा प्रसाद नामजोशी यांची आहे़