माझ्या चित्रपटाच्या कथा या हटकेच असणार

By Admin | Published: March 22, 2017 01:10 AM2017-03-22T01:10:58+5:302017-03-22T01:10:58+5:30

अनुष्का शर्माने ‘रब ने बनादी जोडी’, ‘जब तक है जान’, ‘सुलतान’, ‘पीके’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे.

The story of my film is going to be true | माझ्या चित्रपटाच्या कथा या हटकेच असणार

माझ्या चित्रपटाच्या कथा या हटकेच असणार

googlenewsNext

अनुष्का शर्माने ‘रब ने बनादी जोडी’, ‘जब तक है जान’, ‘सुलतान’, ‘पीके’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे. त्याचसोबत तिने ‘एनएच 10’सारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता ‘फिल्लोरी’ या तिच्या आगामी चित्रपटाची निर्मिती करण्यासोबतच या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...
‘फिल्लोरी’ या चित्रपटात तू भूताची भूमिका साकारत आहेस, तुझा स्वत:चा भूतावर विश्वास आहे का?
- अनेकवेळा लहान मुलांना त्यांचे आई-वडील अथवा घरातील मोठी मंडळी भूताच्या कथा सांगतात; पण मी लहानपणी माझ्या पालकांकडून कधीच भूताच्या कथा ऐकल्या नाहीत; भूत असते असे मी अनेकांकडून ऐकले आहे. एखादी शक्ती असते असे अनेकजण म्हणतात; पण याचा अनुभव मला कधीच आलेला नाही.

‘फिल्लोरी’ या चित्रपटाची तू निर्मिती करीत असताना या चित्रपटातील मुख्य भूमिका तू साकारावी असा विचार कसा केलास?
- मला देवाच्या कृपेने अनेक चित्रपट मिळत असल्याने आमचे प्रोडक्शन हाऊस हे मी चित्रपटात काम करावे यासाठी बनवले गेलेले नाहीये, असे माझा भाऊ नेहमी बोलतो; पण जर एखाद्या भूमिकेसाठी मी योग्य असेन तर कोणत्या नायिकेने काम करण्याऐवजी मी चित्रपटात काम का करू नये, असा विचार आम्ही केला. आणि त्यामुळेच मी या चित्रपटात काम करण्याचे ठरवले; तसेच या भूमिकेसाठी मी योग्य आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक अनशाई लाल यांचे म्हणणे होते. भविष्यात एखाद्या भूमिकेत मी योग्य नसल्यास माझ्याऐवजी दुसरी अभिनेत्री तुम्हाला माझ्या होम प्रोडक्शनमध्ये नक्कीच पाहायला मिळेल.

तू हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहेस, यानंतर मराठी चित्रपटाच्या निर्मितीचा काही विचार आहे का?
- सध्या मराठीत एकापेक्षा एक चांगल्या कथा पाहायला मिळत आहेत. ‘सैराट’ आणि ‘फ्रँडी’ या चित्रपटांविषयी मी खूप काही ऐकले आहे; पण हे चित्रपट पाहाण्याची मला संधी मिळालेली नाही. पण माझ्या भावाला अनेक मराठी चित्रपट आवडतात. प्रादेशिक सिनेमात सध्या चांगल्या कथा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चांगली कथा आणि योग्य संधी असल्यास मी मराठी चित्रपटांची निर्मिती नक्कीच करेन.

तू निर्मिती करत असलेल्या चित्रपटांची कथा नेहमीच हटके असते,याचे काही विशेष कारण आहे का?
आम्ही आमच्या प्रोडक्शन हाऊसतर्फे खूप वेगळे चित्रपट बनवण्याचे ठरवले आहे. खरे तर लोकांना तेच तेच पाहून कंटाळा आला आहे. त्यामुळे पुढील काळातही आमच्या चित्रपटांच्या कथा या हटकेच असणार आहेत. कोणताही चित्रपट करत असताना तुम्हाला मजा आली पाहिजे, असे मला वाटते.

चित्रपटांपेक्षा आजकाल प्रमोशनला अधिक वेळ जातो असे तुला वाटते का? ‘फिल्लोरी’ या चित्रपटाचे प्रमोशन तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने केले आहे. त्याबाबत काय सांगशील?

- खरं आहे, सध्या चित्रपटाचे प्रमोशन करणे हे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यापेक्षा कठीण झाले आहे. तरीही मी चित्रीकरणासोबतच चित्रपटाचे प्रमोशन करणे देखील एन्जॉय करते. या चित्रपटात मी एका भूताच्या भूमिकेत असल्याने हे भूत कधी, कुठेही असू शकते असा विचार करून आम्ही फोटोशॉपद्वारे मला अनेक जुन्या फोटोमध्ये टाकले आणि लोकांना आमची ही प्रमोशनची आयडिया खूप आवडली.

Web Title: The story of my film is going to be true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.