Stree 2 Box Office : श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' बॉक्स ऑफिसवर सुसाट, १० दिवसांतच पार केला ५०० कोटींचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 04:32 PM2024-08-25T16:32:05+5:302024-08-25T16:32:21+5:30

'स्त्री २' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, १० दिवसांतच बंपर कमाई

Stree 2 Box Office shraddha kapoor rajkumar rao movie worldwide crossed 500cr | Stree 2 Box Office : श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' बॉक्स ऑफिसवर सुसाट, १० दिवसांतच पार केला ५०० कोटींचा टप्पा

Stree 2 Box Office : श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' बॉक्स ऑफिसवर सुसाट, १० दिवसांतच पार केला ५०० कोटींचा टप्पा

श्रद्धा कपूर, राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेल्या 'स्त्री २' सिनेमाच्या चाहते प्रतिक्षेत होते. २०१८ साली प्रदर्शित झालेला स्त्री सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमानंतर 'स्त्री २' प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर गुरुवारी(१५ ऑगस्ट) सर्वत्र प्रदर्शित झाला. थिएटरमध्ये प्रदर्शित होताच 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं आहे. १० दिवसांतच या सिनेमाने देशात ३०० कोटींचा आकडा तर जगभरात ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. 

सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'स्त्री २'ने पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग केली. प्रदर्शनाच्या दिवशी श्रद्धा कपूरच्या सिनेमाने तब्बल ५१.८ कोटींचा गल्ला जमवला. यंदाच्या वर्षातील बॉलिवूडमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा 'स्त्री २' दुसरा सिनेमा ठरला आहे. सिनेमाच्या प्रदर्शनांनतर दुसऱ्या दिवशी कमाईत घट झाल्याचं पाहायला मिळालं. पण, वीकेंडला या सिनेमाने पुन्हा बॉक्स ऑफिस गाजवलं. सध्या बॉक्स ऑफिसवर केवळ स्त्री २ सिनेमाचाच बोलबाला असल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ १० दिवसांत या सिनेमाने ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने देशात ३६६.३८ कोटींची कमाई केली आहे.  तर जगभरात सिनेमाने ५०५ कोटींचा गल्ला जमवला आहे. 


'स्त्री २'मध्ये लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. या सिनेमात राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार पुन्हा एकदा धमाल करताना दिसत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा या सिनेमात कॅमिओ आहे. 'स्त्री २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याचीही सर्वांना उत्सुकता आहे.
 

Web Title: Stree 2 Box Office shraddha kapoor rajkumar rao movie worldwide crossed 500cr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.