Stree 2 : थिएटरला पछाडल्यानंतर आता ओटीटीवर येणार श्रद्धा कपूरचा 'स्त्री २', कधी रिलीज होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 03:56 PM2024-09-18T15:56:27+5:302024-09-18T15:57:24+5:30

थिएटरमध्ये प्रदर्शित होताच 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं. आता थिएटर गाजवल्यानंतर श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

stree 2 ott release shraddha kapoor movie will release on amazon prime on 27 september | Stree 2 : थिएटरला पछाडल्यानंतर आता ओटीटीवर येणार श्रद्धा कपूरचा 'स्त्री २', कधी रिलीज होणार?

Stree 2 : थिएटरला पछाडल्यानंतर आता ओटीटीवर येणार श्रद्धा कपूरचा 'स्त्री २', कधी रिलीज होणार?

Stree 2 : श्रद्धा कपूर, राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेल्या 'स्त्री २' सिनेमाच्या चाहते प्रतिक्षेत होते. २०१८ साली प्रदर्शित झालेला 'स्त्री' सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमानंतर 'स्त्री २'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर १५ ऑगस्टला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. थिएटरमध्ये प्रदर्शित होताच 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं. केवळ देशातच नाही तर जगभरात या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडूनही प्रेम मिळत आहे. आता थिएटर गाजवल्यानंतर श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, 'स्त्री २' सिनेमा सप्टेंबर महिन्यातच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. येत्या २७ सप्टेंबरला म्हणजे अवघ्या १० दिवसांत श्रद्धा कपूरचा 'स्त्री २'  ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पण, हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला तरी सुरुवातीला काही दिवस रेंटवर असणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी 'स्त्री २' प्रेक्षकांना पाहता येईल. अॅमेझॉन प्राइमवर हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.


'स्त्री २'  सिनेमात श्रद्धा कपूरबरोबर राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना, अभिषेक बॅनर्जी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर तमन्ना भाटिया, अक्षय कुमार आणि वरुण धवन यांचा कैमिओ आहे. आतापर्यंत 'स्त्री २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५८५ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा लवकरच ६०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. 
 

Web Title: stree 2 ott release shraddha kapoor movie will release on amazon prime on 27 september

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.