दमदार अभिनयाने नटलेला चित्रपट

By Admin | Published: August 22, 2014 11:15 PM2014-08-22T23:15:49+5:302014-08-22T23:15:49+5:30

आजकाल लहान मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना सर्रास ऐकायला मिळतात. त्यांचे अपहरण करून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते.

A strong acting film | दमदार अभिनयाने नटलेला चित्रपट

दमदार अभिनयाने नटलेला चित्रपट

googlenewsNext
आजकाल लहान मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना सर्रास ऐकायला मिळतात. त्यांचे अपहरण करून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते. यात राजकारणी आणि गुन्हेगारी जगतातील अनेक बडय़ा आसामींचेही साटेलोटे असते. या विषयावर याआधी अनेक चित्रपट तयार झाले आहेत. मात्र यशराज निर्मित आणि प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘मर्दानी’  चित्रपटात हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. 
मुंबईतल्या झोपडपट्टीत राहणारी एक मुलगी प्यारी अचानक गायब होते. गायब झाल्यामुळे त्यासंदर्भात शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेतील जिगरबाज महिला पोलीस अधिकारी शिवानी (राणी मुखर्जी)ची निवड केली जाते. प्यारीच्या शोधासाठी शिवानी जंग जंग पछाडते. जेव्हा ती या प्रकरणाच्या मुळाशी जाते तेव्हा या धंद्यातील टोळीचे धागेदोरे थेट दिल्लीर्पयत गेल्याची तिला जाणीव होते. त्यासाठी शिवानी दिल्लीला जाते. तिथे गेल्यावर त्या गँगर्पयतही पोहोचण्याचे ती प्रयत्न करते. त्यात आपला जीव धोक्यात घालण्याचे अनेक प्रसंग 
तिच्यावर येतात. त्यातून मार्ग काढत शेवटी शिवानी त्या गँगचा खरा 
चेहरा जगासमोर आणण्यात यशस्वी ठरते.
वैशिष्टय़े - दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी याआधी ‘परिणीता’, ‘लागा चुनरी मे दाग’ आणि ‘लफंगे परिंदे’ हे चित्रपट निर्माण केले आहेत. हे सर्व चित्रपट ीप्रधान होते. आता पुन्हा त्यांनी ीप्रधानच विषय निवडला आहे. कथेला साजेशी दृश्ये असल्याने चित्रपटाचा वेग कायम राहतो, हेच चित्रपटाचे मोठे वैशिष्टय़ आहे. राणी मुखर्जीने पोलीस अधिका:याची भूमिका अतिशय सशक्तपणो साकारली आहे. तिने या चित्रपटात घेतलेली पुरेपूर मेहनत दिसून येते. आजवरच्या भूमिकांपैकी राणीची सगळ्यात चांगली भूमिका असलेला हा चित्रपट असल्याचे म्हणता येईल. तर खलनायकाच्या भूमिकेत ताहिर राज भसीन यानेही चांगले काम केले आहे. 
साहाय्यक भूमिकांमध्ये जिसू सेन गुप्ता, प्रियंका शर्मा, मोना आंबेगावकर यांनीही भूमिकांना न्याय दिला आहे. चित्रपटाचे संवादही चांगले आहेत. चित्रपटातील शेवटचे संवादही टाळ्या घेतात. तांत्रिकदृष्टय़ाही चित्रपट उत्तम आहे. विषयाला पुरेपूर न्याय देण्याचा स्तुत्य प्रयत्न प्रदीप सरकार यांनी केला आहे. 
उणिवा - शिवानीला जिगरबाज पोलीस अधिकारी दाखवण्याच्या नादात चित्रपट थोडासा भरकटतो. चित्रपटाच्या शेवटी संवाद जरी चांगले असले तरी दृश्ये नवी नसल्याने निराशा होते. लोकांना पुढे काय होणार याची आधीच जाणीव होते. राणीच्या चेह:यावर आता वय वाढल्याच्या खुणाही स्पष्टपणो दिसतात. पोलीस आणि गँगच्या हाणामारीची दृश्ये खूपच नाटकी वाटतात. या धंद्यात बळी पडलेल्या मुलींवरची काही दृश्ये तर कुटुंबासमवेत बसून पाहताही येत नाहीत. खलनायकाच्या भूमिकेलाही योग्य न्याय दिलेला नाही. 

 

Web Title: A strong acting film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.