सुभाष घई यांचा 'विजेता' पुन्हा प्रदर्शनासाठी सज्ज ,सुबोध भावे मुख्य भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 05:38 PM2021-10-25T17:38:39+5:302021-10-25T17:39:27+5:30
सुबोध भावे,पुजा सावंत, प्रीतम कागणे ,सुशांत शेलार,माधव देवचक्के,मानसी कुलकर्णी ,तन्वी किशोर,देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, क्रुतिका तुलसकर,आणि गौरीश शिपुरकर या कलावंतांचा समावेश आहे.
रुपेरी पडद्यावर आजवर विविध खेळांचं दर्शन रसिकांना झालं आहे. क्रिकेट, हॉकी, रनिंग, बॉक्सिंग, कुस्ती अशा खेळांवर आधारित सिनेमा रसिकांनी डोक्यावर घेतले. खेळ प्रेमी अशी ओळख असलेल्या आपल्या देशात 'इकबाल', 'एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी' असे क्रिकेटवर आधारित सिनेमा जितके हिट ठरले तितकीच पसंती 'दंगल', 'चक दे इंडिया', 'मेरी कॉम', 'सुलतान' या विविध खेळांवर आधारित चित्रपटांना मिळाली.
खेळाचा पार्श्वभूमी असलेला 'विजेता' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.मुक्ता आर्ट्स ची निर्मिती असलेला चित्रपट "विजेता" येत्या १२ मार्च 2020 रोजी रिलीज झाला होता पण कोरोनाचा उद्रेक वाढल्याने चित्रपटाचे प्रदर्शन एका दिवसात मागे घेण्याचा निर्णय सुभाष घई यांनी घेतला होता. पण आता परिस्थिती पुन्हा हळू हळू पूर्व पदावर येत आहे आणि मुक्ता आर्टस्ने विजेताचे पुन्हा प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. मल्टीस्टारर चित्रपट आहे. ज्यामध्ये सुबोध भावे,पुजा सावंत, प्रीतम कागणे ,सुशांत शेलार,माधव देवचक्के,मानसी कुलकर्णी ,तन्वी किशोर,देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, क्रुतिका तुलसकर,आणि गौरीश शिपुरकर या कलावंतांचा समावेश आहे.
खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचा मागील नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय नसल्यामुळे, महाराष्ट्राच्या स्पोर्ट्स अकॅडेमीच्या डीन वर्षा कानविंदे (मानसी कुलकर्णी) माईंड कोच म्हणून सौमित्र देशमुख (सुबोध भावे) यांची निवड करतात. सौमित्र पुढे महाराष्ट्राला जिंकवून देणं हे त्याचं ध्येय असतं. तो सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे आणि स्पर्धा जिंकण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम करतो .
त्या सर्वां मधील हरवलेलाआत्मविश्वास कसा परतआणतो , त्यांना मनाच्या कुरुक्षेत्रावर जिंकायला कसं शिकवतो आणि हे सर्व करताना त्याच्या स्वतःच्या भूतकाळाला हरवून महाराष्ट्राला विजयपथावर कसा घेऊन जातो यावर हा चित्रपट आधारित आहे, येत्या 3 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.