मृण्मयी झाली प्रस्तुतकर्ती
By Admin | Published: February 27, 2016 03:38 AM2016-02-27T03:38:40+5:302016-02-27T03:38:40+5:30
अलीकडे मराठी चित्रपटांत निर्मात्यांसह वेगळा प्रस्तुतकर्ता असण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. दिग्दर्शक रवी जाधवनं काही चित्रपट प्रस्तुत केले आहेत. आता त्यानंतर मृण्मयी
अलीकडे मराठी चित्रपटांत निर्मात्यांसह वेगळा प्रस्तुतकर्ता असण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. दिग्दर्शक रवी जाधवनं काही चित्रपट प्रस्तुत केले आहेत. आता त्यानंतर मृण्मयी देशपांडे प्रस्तुतकर्ती म्हणून समोर येत आहे. आपल्या उत्तम अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या मृण्मयीनं ही नवी वाटचाल सुरू केली आहे. तिची प्रमुख भूमिका असलेला अनुराग हा चित्रपट ती प्रस्तुत करीत आहे. 'अनुराग' हा माझ्यासाठी केवळ चित्रपट नाही. तो शब्दातीत अनुभव आहे. चांगल्या चित्रपटासाठी अशी जबाबदारी घेण्यात मला काहीही धोका वाटला नाही. त्याशिवाय या चित्रपटाच्या टीमशी माझं ट्युनिंग उत्तम जमलेलं असल्यानं वेगळी जबाबदारी घेण्यासाठी, प्रयोग करून पाहण्यासाठी हीच संधी योग्य वाटली. चांगल्या कामासाठी धोका पत्करणं मला महत्त्वाचं वाटलं. मराठी चित्रपटात होत असलेल्या वेगळ्या प्रयोगांना आपणच बळ दिलं पाहिजे,' अशी भावना तिनं व्यक्त केली. मृण्मयी देशपांडे क्रिएशन्सच्या माध्यमातून ती हा चित्रपट सादर करीत आहे. आरआरपी कॉर्पोरेशन लिमिटेडने निर्मिती आणि डॉ. अंबरीश दरक यांनी चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलेला हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.