सुबोध भावे - श्रुती मराठेचे हे रॉमँटीक गाणे तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 02:25 PM2018-09-03T14:25:39+5:302018-09-03T14:55:53+5:30

विवाह संस्थेवर भाष्य करणारा हा अस्सल कौटुंबिक सिनेमा असून,यात  डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहे.

Subodh Bhave And Shruti Marathe's New Movie Shubh Lagna Savdhan Romantic Song Launch | सुबोध भावे - श्रुती मराठेचे हे रॉमँटीक गाणे तुम्ही पाहिले का?

सुबोध भावे - श्रुती मराठेचे हे रॉमँटीक गाणे तुम्ही पाहिले का?

googlenewsNext

कौटुंबिक, नातेसंबंध आणि लग्न सोहळ्याची धम्माल असणारे सिनेमा रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरले. रसिकांना या सिनेमांमधील फॅमिली ड्रामा चांगलाच भावला. त्यामुळेच राजश्री प्रॉडक्शन्सच्या हम आपके है कौन आणि हम साथ साथ है, विवाह अशा सिनेमांना रसिकांनी डोक्यावर घेतले. असे सिनेमा हिंदीत तुफान हिट ठरले असले तरी मराठीत असा प्रयोग आता मराठी सिनेमातही पाहायला मिळणार आहे. लग्न सोहळ्याची धम्माल 'शुभ लग्न सावधान' आगामी मराठी सिनेमातही रसिकांना अनुभवयाला मिळणार आहे.

 'बंध नायलॉन' चे या मराठी सिनेमानंतर अभिनेता सुबोध भावे आणि श्रुती मराठी या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी ही जोडी रसिकांना पाहायला मिळणार आहे.पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा येत्या १२ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर रॉमँटीक गाणे लाँच करण्यात आले.'हे वेड आहेस तू' असे या गाण्याचे बोल असून,सुबोध आणि श्रुतीची लव्ह केमिस्ट्री यात पाहायला मिळते. तसेच,या गाण्यात दुबईचे बुर्ज अल अरब हे सप्ततारांकित हॉटेल आपल्याला दिसून येत असून, तेथील गगनचुंबी इमारती पाहणाऱ्यांचे डोळे दिपवून टाकतात. 

प्रेमी जोडप्यांना आकर्षित करणारे हे गाणे मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे. शिवाय, चिनार आणि महेश यांचे संगीत असलेल्या या गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि अपेक्षा दांडेकर यांचा गोड आवाज लाभला असल्याकारणामुळे हे गाणे 'वेड' लावून जाते. विवाह संस्थेवर भाष्य करणारा हा अस्सल कौटुंबिक सिनेमा असून,यात  डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहे. दुबईत आणि इगतपुरीत चित्रिकरण झालेल्या या सिनेमासाठी अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे व तुषार कर्णिक यांनी निर्मिती सहाय्य केले आहे. नात्यांचे बंध कसे उलगडतात हे या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.
 

Web Title: Subodh Bhave And Shruti Marathe's New Movie Shubh Lagna Savdhan Romantic Song Launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.