सुबोध भावे म्हणतो, कलाकाराची प्रामाणिकता ह्या गोष्टीशी असावी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 06:30 AM2019-02-04T06:30:00+5:302019-02-04T06:30:00+5:30

कलाकाराची प्रामाणिकता ही त्याच्या कलेशी असावी असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे याने नुकतेच केले.

Subodh Bhave says, the authenticity of the artist should be with this thing | सुबोध भावे म्हणतो, कलाकाराची प्रामाणिकता ह्या गोष्टीशी असावी

सुबोध भावे म्हणतो, कलाकाराची प्रामाणिकता ह्या गोष्टीशी असावी

googlenewsNext
ठळक मुद्देकलेशी पक्की नाळ जोडण्यासाठी कलाकाराने रंगभूमीशी घट्ट नाते जोडणे महत्वाचे - सुबोध भावे

कलाकाराची प्रामाणिकता ही त्याच्या कलेशी असावी असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे याने नुकतेच केले. सुबोध भावे याने चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका या तिनही माध्यमांत कामे केले असून त्याने बालगंधर्व, लोकमान्य टिळक ...आणि काशिनाथ घाणेकर या चरित्रपटातील त्याच्या भूमिका आजरामर झाल्या आहेत. कॉलेजमध्ये असतांनाच सुबोध नाटके दिग्दर्शित करायचा. 

सुबोध भावेने पुरुषोत्तम करंडकांत सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिळाली आहेत. सिल्वर समोहाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुबोधने त्याचे विचार मांडले. त्यावेळी सिल्व्हर समोहाचे किरण सावंत, संतोष बारणे, सोमनाथ सस्ते, विकास साने आणि आ. महेश दादा लांडगे हे मान्यवर उपस्थित होते. 
सुबोध पुढे असे म्हणाला की, कलाकाराने कोणत्याही चौकटीत न अडकता त्याने काम केले पाहिजे. कलेशी पक्की नाळ जोडण्यासाठी कलाकाराने रंगभूमीशी घट्ट नाते जोडणे महत्वाचे असून तेथेच कलाकार घडला जात असतो. त्याच बरोबर मराठी चित्रपटाकडे बघताना मनोरंजनात्मक दृष्टीने बघणे गरजेचे आहे. यातून काय संदेश मिळेल. यातून काय शिकायला मिळेल. यापेक्षा मनोरंजन म्हणून बघणे महत्वाचे आहे. ही खिलाडी वृत्ती असायला हवी.
प्रा. वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले हे गाजलेले नाटक आता पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहे. अभिनेता सुबोध भावे हे नाटक पुन्हा नाट्यप्रेमींसाठी घेऊन येत असल्याचे एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले.
 

Web Title: Subodh Bhave says, the authenticity of the artist should be with this thing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.