भूमिकेसाठी असेही प्रयोग...

By Admin | Published: September 19, 2015 01:21 AM2015-09-19T01:21:26+5:302015-09-19T12:46:43+5:30

आमीर खान हा किती परफेक्शनिस्ट आहे हे सर्वांना माहिती आहे. स्क्रिप्टच्या मागणीनुसार स्वत:च्या शरीरात हवा तो बदल करण्यास तो जरादेखील मागेपुढे पाहात नाही. ‘गजनी’ चित्रपटासाठी

Such an experiment for the role ... | भूमिकेसाठी असेही प्रयोग...

भूमिकेसाठी असेही प्रयोग...

googlenewsNext

- कुणी वजन वाढवले, तर कुणी झाले झीरो साइज

आमीर खान हा किती परफेक्शनिस्ट आहे हे सर्वांना माहिती आहे. स्क्रिप्टच्या मागणीनुसार स्वत:च्या शरीरात हवा तो बदल करण्यास तो जरादेखील मागेपुढे पाहात नाही. ‘गजनी’ चित्रपटासाठी त्याने सिक्स पॅक अ‍ॅब्ज बनविले तेव्हाही याची प्रचिती आली होती. आता आगामी ‘दंगल’ या चित्रपटासाठीही त्याने थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ३० किलो वजन वाढविले आहे. या चित्रपटात तो कुस्तीगीर महावीरसिंग पोघाटची भूमिका साकारतोय. वयाच्या ५०व्या वर्षी इतके वजन वाढविण्याचा प्रयोग त्याला महागात पडू शकतो. आपल्या भूमिकेसाठी बरेचसे कलाकार जीवावर बेतण्याइतपत प्रयोग करतात. अशाच काही कलाकारांच्या वजन प्रयोगाची ही हटके स्टोरी...

भूमी पेडणेकरची
मेहनत कामी आली
नवागत अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटासाठी वजन वाढवले होते. नंतर तिने चक्क तब्बल २० किलो वजन कमी केले. पुढच्या चित्रपटात तिला अत्यंत कृश अशी भूमिका करायची होती. त्यामुळे तिने वजन कमी केले. तिची ही मेहनत फळाला आली; ती खरंच रोड झाली.

‘द मशिनिस्ट’साठी झाला
एकदम बारीक
२००४ साली ख्रिस्टियन बेलने ‘द मशिनिस्ट’साठी तब्बल ३० किलो वजन कमी केले. त्यानंतर तो कधीही जाड झाला नाही. यामुळे त्याचे लिव्हरही खराब झाले. बॅटमन सुरू होण्यापूर्वी त्याचे वजन ३५ किलोने वाढले.

मॅथ्यूचा चक्क मृत्यूशी खेळ
मॅथ्यू मॅक्नाघेने एड्सग्रस्ताची भूमिका साकारण्यासाठी तब्बल २० किलोने वजन कमी केले. यामुळे तो अगदीच सडपातळ दिसायचा. या दरम्यान तो कधीही घराबाहेर पडला नाही. या काळात त्याने खूप वाचन आणि लिखाण केले.

‘डर्टी पिक्चर’साठी खास परिश्रम
विद्या बालन नेहमीच आपले वजन घटविण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु ‘डर्टी पिक्चर’चा प्रस्ताव आला आणि तिला सिल्क स्मितासारखे दिसण्यासाठी १२ किलो वजन वाढवावे लागले. यानंतर मात्र ती स्लीम होऊ शकली नाही.

करिनाने केले गप्प
करिना कपूरने ठरवून ‘टशन’साठी स्वत:चे साइज झीरो केले. त्यामुळे टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झालीत. काही कालावधीनंतर ती मूळ पदावर आली. परंतु पुन्हा तिने कधी साइज झीरो करण्याचा प्रयत्न केला नाही.

- sameer.inamdar@lokmat.com

Web Title: Such an experiment for the role ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.