cruise rave party: किंग खानवर संकटांचा डोंगर! आर्यनच्या अटकेनंतर सुहानाची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 11:28 AM2021-10-14T11:28:31+5:302021-10-14T11:29:19+5:30

cruise rave party: आज दुपारी १२ वाजता आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. एनसीबीचे वकील युक्तीवाद सुरु ठेवणार असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे.

suhana khans health is critical after her brothers arrest | cruise rave party: किंग खानवर संकटांचा डोंगर! आर्यनच्या अटकेनंतर सुहानाची प्रकृती चिंताजनक

cruise rave party: किंग खानवर संकटांचा डोंगर! आर्यनच्या अटकेनंतर सुहानाची प्रकृती चिंताजनक

googlenewsNext
ठळक मुद्देआर्यनला अटक झाल्याची माहिती मिळताच सुहाना तातडीने न्यूयॉर्कवरुन मुंबईच्या दिशेने रवाना होणार होती.

cruise drugs case: अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) सध्या अनेक संकंटांचा सामना करत आहे. २ ऑक्टोबर रोजी किंग खानचा लेक आर्यन खान (aryan khan) याला ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीबीने (NCB) अटक केली. त्यानंतर आता शाहरुखची लेक सुहाना खानची (suhana khan) प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सध्या शाहरुखच्या चहू बाजुने संकटांचा डोंगर उभा असल्याचं म्हटलं जात आहे.

मुंबईतील एका क्रुझवर ड्रग्स पार्टी केल्याप्रकरणी एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. आज (१४ ऑक्टोबर) आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयात आज नेमका कोणता निर्णय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आर्यनला अटक झाल्याची माहिती मिळताच सुहाना तातडीने न्यूयॉर्कवरुन मुंबईच्या दिशेने रवाना होणार होती. मात्र, त्याच दरम्यान, तिची प्रकृती ढासळली.

Cruise Drugs Case: आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खानला नेमकं कुठे ठेवलंय?

सुहानाची प्रकृती स्थिर नसल्यामुळे गौरी आणि शाहरुखने तिला या अवस्थेत मुंबईत येण्यास नकार दिला आहे. मात्र, सुहाना सातत्याने आर्यनविषयीची माहिती घेत आहे. सुहानसोबतच आता अबरामलादेखील या सगळ्याचा सामना करावा लागत आहे.

किंग खानचा लहान मुलगा अबरामच्या  (abram khan) बालमनावरदेखील या सगळ्याचा परिणाम होत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या शाहरुखच्या संपूर्ण कुटुंबावर आर्यनच्या अटकेचा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे.

Cruise Drugs Case: आर्यन खानमुळे शाहरुखच्या डुप्लिकेटवर आली उपासमारीची वेळ

आज होणार आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी

आज दुपारी १२ वाजता आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. एनसीबीचे वकील युक्तीवाद सुरु ठेवणार असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे. जर ५ वाजेपर्यंत निकाल आला नाही तर पुढील ५ दिवस कोर्ट बंद राहणार आहे. त्यामुळे आर्यनच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 

Web Title: suhana khans health is critical after her brothers arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.