Sukesh Chandrasekhar : "जॅकलिनचं गाणं ऐकणाऱ्या १०० लोकांना iPhone 15 Pro देणार"; सुकेश चंद्रशेखरची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 09:03 AM2024-07-13T09:03:22+5:302024-07-13T09:08:26+5:30

Sukesh Chandrasekhar And Jacqueline Fernandez : ११ ऑगस्टला जॅकलिनचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस अत्यंत खास बनवण्यासाठी सुकेशने १०० लोकांना थेट iPhone 15 Pro देण्याची मोठी घोषणा केली आहे. 

Sukesh Chandrasekhar announced to give iphone 15 pro to 100 people on Jacqueline Fernandez birthday | Sukesh Chandrasekhar : "जॅकलिनचं गाणं ऐकणाऱ्या १०० लोकांना iPhone 15 Pro देणार"; सुकेश चंद्रशेखरची मोठी घोषणा

Sukesh Chandrasekhar : "जॅकलिनचं गाणं ऐकणाऱ्या १०० लोकांना iPhone 15 Pro देणार"; सुकेश चंद्रशेखरची मोठी घोषणा

दिल्लीच्या मंडोली जेलमध्ये असलेला २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सातत्याने लव्ह लेटर पाठवत असतो. आता ११ ऑगस्टला जॅकलिनचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस अत्यंत खास बनवण्यासाठी सुकेशने १०० लोकांना थेट iPhone 15 Pro देण्याची मोठी घोषणा केली आहे. 

सुकेशने या लेटरमध्ये सर्वात आधी जॅकलीनचे यिम्मी यिम्मी या नवीन गाण्यासाठी खूप खूप अभिनंदन केलं आहे. सुकेशने त्याच्या वकिलामार्फत मीडियाला पाठवलेल्या लेटमध्ये या गाण्याचं कौतुक केलं आणि हे गाणं अधिक वेळा पाहणाऱ्या १०० लोकांना तो आयफोन भेट म्हणून देणार असल्याची घोषणा केली . आपल्या प्रायव्हेट जेटमध्ये जॅकलिनचे इनीशियल्स JFS लिहिले असल्याचं देखी सुकेशने लव्ह लेटरमध्ये म्हटलं आहे.  

"आजही तू माझ्यासाठी सिंड्रेला आहेस; जॅकलिन बॉलिवूडची रियल क्वीन"

जॅकलिनसाठी लिहिलेल्या लव्ह लेटरमध्ये त्याने जॅकलिनचा फोटो पाहिला आणि तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं. त्याने लिहिलं आहे की आजही तू माझ्यासाठी सिंड्रेला आहेस. जॅकलिनने आपले सुंदर फोटो पोस्ट केल्याबद्दल त्याने तिचे आभार देखील मानले आहेत. "तुझं प्रेम माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. यिम्मी यम्मी हे गाणं पाहणाऱ्यांची संख्या १०० मिलियनहून अधिक झाली आहे. जॅकलिन बॉलिवूडची रियल क्वीन आहे" असं सुकेश चंद्रशेखरने म्हटलं आहे. 

सुकेशने महिला दिनाच्या दिवशीही अभिनेत्रीला लेटर लिहिलं होतं. "माझी राणी, माझी शक्ती आणि माझी सुपरस्टार! हा सर्व महिलांचा दिवस आहे. महिला खऱ्या आयुष्यात सुपरहिरो असतात. जे म्हणतात हे पुरुषांचं जग आहे ते खोटे बोलत आहेत. स्त्री हीच पुरुषाची खरी शक्ती आहे. स्त्रीशिवाय पुरुष काहीच नाही. माझ्या आयुष्यातही जॅकलिनसारख्या सुंदर महिला आहेत. जॅकलीन आज हा दिवस साजरा करत असलेल्या सर्व सुंदर महिलांसाठी एक आदर्श आहेस. तुझ्या इमारतीला आग लागल्याची बातमी समजल्यानंतर माझ्या हृदयाची धडधड थांबली. तू पूर्णपणे ठीक आहेस त्यासाठी मी देवाचे आभार मानतो" असं म्हटलं होतं. 
 

Web Title: Sukesh Chandrasekhar announced to give iphone 15 pro to 100 people on Jacqueline Fernandez birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.