'सुख कळले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्ट शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 06:27 PM2024-09-13T18:27:53+5:302024-09-13T18:28:37+5:30

Sukh Kalale : कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुख कळले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

'Sukh Kalale' Serial going off air, the information was shared by sharing the post | 'सुख कळले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्ट शेअर करत दिली माहिती

'सुख कळले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्ट शेअर करत दिली माहिती

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे सुख कळले. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत दिसत आहे. तिने मिथिला हे पात्र साकारले आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्पृहा जोशी हिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिकेच्या टीमचे आभार मानले आहेत. 

अभिनेत्री स्पृहा जोशी हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून मालिका लवकरच निरोप घेत असल्याचे समजते आहे. तिने मालिकेतील कलाकारांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लिहिले की, प्रवास कितीही छोटा असो.. निरोप नेहमीच कठीण असतो.. मी तुम्हा सर्वांसोबत खूप छान वेळ घालवला.. धन्यवाद आणि संधीबद्दल कृतज्ञ! कलर्स मराठी. केदार शिंदे, सुचित्रा बांदेकर.


मालिका घेतेय निरोप
सुख कळले मालिकेतील मिथिला उत्तम गृहिणी असताना तिचे टाइम आणि रिसोर्स मॅनेजमेंट स्किल वापरुन नोकरीतही उजवी ठरतेय. धावत्या जगासोबत जगण्याच्या तिच्या प्रयत्नांना कधी आणि कसं यश मिळवते हे या मालिकेत दाखवण्यात आले. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

वर्कफ्रंट
स्पृहाने अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमधून काम केलं आहे. 'उंच माझा झोका', 'एका लग्नाची तिसरी गोष्ट', 'अग्निहोत्र', 'लोकमान्य' या मालिकांमधील तिच्या भूमिका गाजल्या. स्पृहाने 'सूर नवा ध्यास नवा' या शोचं सूत्रसंचालन देखील केलं आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच स्पृहा उत्तम लेखिका आणि कवयित्रीदेखील आहे. 

Web Title: 'Sukh Kalale' Serial going off air, the information was shared by sharing the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.