‘सुलतान’ने शांघाय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पटकावला ‘हा’ अवॉर्ड!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2017 03:44 PM2017-06-24T15:44:51+5:302017-06-24T21:14:51+5:30

बॉलिवूडचा सुलतान सलमान खान याच्या फॅन्सकरिता एक आनंदाची बातमी आहे. कारण शांघाय येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सलमानच्या ‘सुलतान’ने ...

'Sultan' won the Shanghai Film Festival 'Ha' award !! | ‘सुलतान’ने शांघाय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पटकावला ‘हा’ अवॉर्ड!!

‘सुलतान’ने शांघाय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पटकावला ‘हा’ अवॉर्ड!!

googlenewsNext
लिवूडचा सुलतान सलमान खान याच्या फॅन्सकरिता एक आनंदाची बातमी आहे. कारण शांघाय येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सलमानच्या ‘सुलतान’ने धूम उडवून दिली आहे. शिवाय यशराज फिल्म्सच्या या मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटाने फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट अ‍ॅक्शन फिल्मस्’चा अवॉर्डही मिळवला आहे. ‘सुलतान’चा हा अवॉर्ड इंडस्ट्रीसाठी खरोखरच गौरवास्पद असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

चित्रपटाबाबत आश्चर्यचकीत करणारी आणखी एक बाब म्हणजे बेस्ट अ‍ॅक्शन कॅटेगिरीत प्रसिद्ध अ‍ॅक्शन अभिनेता जॅकी चैन याचाही एक चित्रपट होता. त्याचबरोबर जगभरातील इतरही बºयाचशा चित्रपटांचा या कॅटेगिरीत समावेश होता. मात्र या सर्वांना धोबीपछाड देत सलमानच्या ‘सुलतान’ने पुरस्कारात बाजी मारली आहे. यशराज फिल्म्सचा एकही मेंबर या अवॉर्ड सोहळ्यासाठी उपस्थित नव्हता. त्यामुळे प्रकाश गुप्ता (काउंसल जनरल आॅफ इंडिया, शांघाय’ यांनी हा अवॉर्ड स्वीकारला. 

दरम्यान, ही आनंदाची बातमी जाहीर करताना चित्रपटाचे दिग्दर्शक अब्बास जफरने म्हटले की, शांघाय येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आम्हाला मिळालेले प्रेम आणि सन्मानामुळे मी खूपच उत्साहित आहे. जॅकी चैन यांच्या हस्ते अ‍ॅक्शन कॅटेगिरीत मिळालेल्या या अवॉर्डला मी सुपर स्पेशल समजतो. ‘सुलतान’ हा चित्रपट देसी भारतीय रेसलिंगवर आधारित आहे. त्यामुळे जगभरातील चित्रपटांच्या तुलनेत ‘सुलतान’ला मिळालेला हा पुरस्कार स्पेशलच म्हणावा लागेल. 

आमिर खान याच्या ‘दंगल’ला चायनामध्ये मिळालेल्या अफाट प्रेमानंतर आता ‘बाहुबली-२’ आणि ‘सुलतान’ हे दोन चित्रपट चायना मार्केटमध्ये धूम उडवून देत आहेत. हा चित्रपट गेल्यावर्षी ईदला रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. 

Web Title: 'Sultan' won the Shanghai Film Festival 'Ha' award !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.