प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान अपघात; नाकाचे हाड मोडले, आता कशी आहे प्रकृती?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 04:35 PM2024-11-03T16:35:20+5:302024-11-03T16:36:04+5:30

शुटिंगदरम्यान अभिनेत्याच्या नाकाचे हाड मोडले.

Sumedh Mudgalkar Suffers Nose Injury On Set Shares Health Update | प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान अपघात; नाकाचे हाड मोडले, आता कशी आहे प्रकृती?

प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान अपघात; नाकाचे हाड मोडले, आता कशी आहे प्रकृती?

'राधा कृष्ण' या टीव्ही मालिकेत कृष्णाची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकणारा अभिनेता सुमेध मुदगलकर याला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. शुटिंगदरम्यान अभिनेत्याच्या नाकाचे हाड मोडले. सुमेधने सोशल मीडियावर स्वत: पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली. त्याचे ऑपरेशन झाले असून त्याने  प्रकृतीविषयीचे अपडेट सोशल मीडियावर शेअर केले.

एका प्रोजेक्टच्या ॲक्शन सीनचे शूटिंग करताना सुमेध मुदगलकरच्या नाकाचे हाड मोडले. त्याने चेहऱ्याचा ब्लॅक अँड व्हाइट फोटोही शेअर केला आहे. यात सुमेधचा चेहरा दिसतोय. चाहत्यांना सुंपर्ण अपघाताची माहिती देत सुमेधने घाबरण्याची गरज नाही, असे सांगितले. यासोबतच त्याने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांचेही आभार मानलेत.


सुमेध याच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करून त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सुमेध हा अभिनेता असण्यासोबतच  डान्सर देखील आहे. त्याने 'डान्स इंडिया डान्स सीझन 4' मध्ये भाग घेतला आहे. 'राधा कृष्ण' मालिकेशिवाय 'चक्रवर्ती अशोक सम्राट' या मालिकेतील त्याच्या शुशिमच्या भुमिकेलाही लोकप्रियता मिळाली होती. लवकरच तो  'मन येड्यागत झालं' या चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Sumedh Mudgalkar Suffers Nose Injury On Set Shares Health Update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.