सूरज झळकणार प्रभू देवाच्या चित्रपटात!

By Admin | Published: June 19, 2017 03:02 AM2017-06-19T03:02:56+5:302017-06-19T03:02:56+5:30

बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर सूरज पांचोलीने दोन वर्षांच्या आपल्या करिअरमधील हा तिसरा चित्रपट साइन केला आहे. त्याचा पुढचा चित्रपट अ‍ॅक्शन आणि कॉमेडी असेल.

The sun god is in the Lord's picture! | सूरज झळकणार प्रभू देवाच्या चित्रपटात!

सूरज झळकणार प्रभू देवाच्या चित्रपटात!

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर सूरज पांचोलीने दोन वर्षांच्या आपल्या करिअरमधील हा तिसरा चित्रपट साइन केला आहे. त्याचा पुढचा चित्रपट अ‍ॅक्शन आणि कॉमेडी असेल. प्रभू देवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाबाबत एक महिन्यापासून चर्चा सुरू आहे. सूरज पांचोलीचे आधीचे चित्रपट फ्लॉप ठरल्याने तो चित्रपटांच्या स्क्रिप्ट खूप विचारपूर्वक निवडतो आहे. सूरजने ट्विटरवर प्रभू देवा आणि निर्माता भूषण कुमारसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोखाली त्याने कॅप्शन दिले आहे. ‘प्रभूदेवा तुझ्यासोबत काम करण्यास मी उत्सुक

आहे. मी तुला बघूनच लहानाचा मोठा झाले आहे. हा चित्रपट कॉमेडी आणि अ‍ॅक्शनने भरपूर असणार आहे. सूरजला रेमो डिसूझा आणि अजय देवगणच्या चित्रपटाचे स्क्रिप्टपण आवडले होते, तरीही त्याने प्रभू देवाच्या चित्रपटाची निवड केली.’ या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करतायेत. या चित्रपटात सूरज आपले डान्सचे जलवे दाखवताना दिसू शकतो. सूरजने ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणीने केले होते. यात त्याच्यासह अथिया शेट्टी झळकली होती. हा चित्रपट सुभाष घई यांच्या १९८३मध्ये आलेल्या चित्रपटचा रिमेक होता.

Web Title: The sun god is in the Lord's picture!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.