'जवान' हिट होत असतानाच त्यातील 'या' कलाकारावर आली गॉगल विकायची वेळ; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 11:02 AM2023-09-15T11:02:17+5:302023-09-15T11:03:07+5:30

Bollywood actor: सध्या सोशल मीडियावर या अभिनेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

sunglasses-video-viral-amid-jawan-record-box-office-collection | 'जवान' हिट होत असतानाच त्यातील 'या' कलाकारावर आली गॉगल विकायची वेळ; Video व्हायरल

'जवान' हिट होत असतानाच त्यातील 'या' कलाकारावर आली गॉगल विकायची वेळ; Video व्हायरल

googlenewsNext

सध्या बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचा 9shahrukh khan) 'जवान' (jawan) हा सिनेमा चांगलाच गाजत आहे. पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी या सिनेमाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे या सिनेमाची चर्चा आहे. यामध्येच या सिनेमातील एक कलाकार चर्चेत आला आहे. एकीकडे सिनेमा हिट ठरत असतानाच दुसरीकडे हा अभिनेता रस्त्यावर गॉगल विकत आहे. त्यामुळे त्याच्यावर ही वेळ का आली? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

प्यार तो होना ही था, बागी यांसारख्या सिनेमात सहकलाकार तर गब्बर, भारत या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा सुनील ग्रोवर कोणासाठी नवीन नाही. द कपिल शर्मा शोमध्ये डॉ. मशहूर गुलाटी आणि गुत्थी या दोन भूमिका साकारुन त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. शाहरुखच्या जवान सिनेमातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. परंतु, सिनेमा रिलीज झाल्यानंतर तो चक्क रस्त्यावर गॉगल विकू लागला आहे.
 
सुनील ग्रोवरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क रस्त्याच्या कडेला उभा राहून येणाऱ्या-जाणाऱ्यांना गॉगल विकत आहे. यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाचं जॅकेट घातलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने तेरी प्यारी प्यारी सूरत या जाहिरातीचं गाणं बॅकग्राऊंडला प्ले केलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुनील सातत्याने असे सर्वसाधारण काम करतानाचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. यापूर्वी त्याने भाजी विकणे, लोकांचा हेअर कट करणे, मक्याची कणसं विकणे अशी कितीतरी कामे केली आहेत.

Web Title: sunglasses-video-viral-amid-jawan-record-box-office-collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.