धर्मेंद्र यांच्यावर अमेरिकेत उपचार होणार, 'गदर 2' च्या यशानंतर सनी देओल वडिलांना घेऊन रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 08:45 AM2023-09-12T08:45:44+5:302023-09-12T08:46:55+5:30

20 दिवसांसाठी दोघंही अमेरिकेत असणार आहेत.

sunny deol took his father dharmendra to USA for treatment break to gadar 2 success | धर्मेंद्र यांच्यावर अमेरिकेत उपचार होणार, 'गदर 2' च्या यशानंतर सनी देओल वडिलांना घेऊन रवाना

धर्मेंद्र यांच्यावर अमेरिकेत उपचार होणार, 'गदर 2' च्या यशानंतर सनी देओल वडिलांना घेऊन रवाना

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये देओल कुटुंब खूपच चर्चेत आहे. आधी सनी देओलच्या (Sunny Deol) लेकाचं लग्न, नंतर 'गदर 2' ला मिळालेलं यश आणि आणखीही बऱ्याच कारणांनी देओल कुटुंब प्रसिद्धीझोतात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सनी देओल 'गदर 2' चं यश सेलिब्रेट करतोय. पण आता धर्मेंद्र (Dharmendra) आणि सनी हे बापलेक काही दिवस गायब असणार आहेत. याचं कारण म्हणजे सनी देओल धर्मेंद्र यांना उपचारासाठी अमेरिकेत घेऊन गेला आहे. 

माध्यम रिपोर्ट्सनुसार धर्मेंद्र यांच्यावर  २० दिवस अमेरिकेत उपचार होणार आहेत. धर्मेंद्र यांचं वय ८७ वर्ष असून त्यांच्या तब्येतीसंबंधित काही समस्या आहेत. म्हणून पुढील उपचार अमेरिकेत करण्याचा निर्णय घेण्यात आला. १५ ते २० दिवस ते अमेरिकेतच असतील. हे ऐकून चाहते चिंतेत पडले असल्याने  काळजी करण्याचं कारण नाही असं देओल कुटुंबाकडून सांगण्यात आलंय.

धर्मेंद्र यांनी नुकतंच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात काम केलं. यामध्ये त्यांची आणि शबाना आजमींची केमिस्ट्री खूप गाजली. त्यांचा किसींग सीन तर फारच चर्चेत होता. सिनेमाला तुफान यश मिळालं. एकीकडे हा तर दुसरीकडे लेकाच्या 'गदर 2' ने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. आता या सर्व सेलिब्रेशनला ब्रेक लागणार आहे. मात्र धर्मेंद्र उपाचारानंतर पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यास सज्ज होणार आहेत.

Web Title: sunny deol took his father dharmendra to USA for treatment break to gadar 2 success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.