Sunny Leone: सनी लिओनीला केरळ उच्च न्यायालयाकडून दिलासा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 01:00 PM2022-11-16T13:00:54+5:302022-11-16T13:04:20+5:30

आपल्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसतानाही या खटल्याच्या प्रक्रियेदरम्यान तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे, असेही अभिनेत्रीने म्हटले आहे.

Sunny Leone cheating case kerala high court stays criminal proceedings against sunny leone | Sunny Leone: सनी लिओनीला केरळ उच्च न्यायालयाकडून दिलासा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Sunny Leone: सनी लिओनीला केरळ उच्च न्यायालयाकडून दिलासा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

googlenewsNext

Sunny Leone Cheating Case: केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेत्री सनी लिओनी ((Sunny Leone), तिचा पती डॅनियल वेबर आणि त्यांच्या कर्मचाऱ्याविरुद्ध दाखल केलेल्या फसवणुकीच्या खटल्यातील फौजदारी कारवाईला स्थगिती दिली. न्यायमूर्ती झियाद रहमान एए यांनी लिओनीच्या याचिकेवर हा आदेश दिला आहे.
या याचिकेवरील सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत न्यायालयाने फौजदारी कारवाईला स्थगिती दिली आहे.

काय आहे प्रकरण 
केरळमधील एका इव्हेंट मॅनेजरने सनी लिओनी, तिचा नवरा आणि त्यांच्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आणि परफॉर्म करण्यासाठी लिओनीला लाखो रुपये देण्यात आल्याचा आरोप  केला होता, , असा आरोप तक्रारकर्त्याने केला होता. त्यानंतर सनी लिओनी, तिचा पती आणि त्यांचे कर्मचारी यांच्याविरुद्ध कलम  406, 420 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सनी लिओनी, तिचा पती आणि त्यांचे कर्मचारी या तिघांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली. 

दुसरीकडे, सनी, तिचा पती आणि तिन्ही कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपण निर्दोष आहोत आणि कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी नसल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे. आपल्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसतानाही या खटल्याच्या प्रक्रियेदरम्यान तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे, असेही अभिनेत्रीने म्हटले आहे.

Web Title: Sunny Leone cheating case kerala high court stays criminal proceedings against sunny leone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.