बेबी डॉल हे काय? चक्क ड्रेसची चेन लावायला घ्यावी लागली 3 लोकांची मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 01:50 PM2021-05-23T13:50:09+5:302021-05-23T13:52:27+5:30

Sunny Leone wardrobe mallfunction : लॉकडाऊनने वाढवले सनी लिओनी वजन; विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ

sunny leone wardrobe mallfunction on the set of mtv splitsvilla | बेबी डॉल हे काय? चक्क ड्रेसची चेन लावायला घ्यावी लागली 3 लोकांची मदत!

बेबी डॉल हे काय? चक्क ड्रेसची चेन लावायला घ्यावी लागली 3 लोकांची मदत!

googlenewsNext
ठळक मुद्देसनी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या बोल्ड फोटोंची तर सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते.

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी (Sunny Leone ) तिच्या फिगर आणि फिटनेसबद्दल किती सतर्क आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. पण हे काय? लॉकडाऊनच्या काळात जरा काय दुर्लक्ष झाले आणि सनी लिओनीचे वजन काही किलोंनी वाढले. मग काय? सनीला कपडेही फिट येईना झालेत. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. या व्हिडीओत सनीच्या ड्रेसची जिप लावण्यासाठी एक-दोन नाही तर तीन तीन लोक प्रयत्न करताना दिसताहेत.

सनीने खुद्द हा व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. यात तिने पिवळ्या रंगाचा गाऊन घातला आहे. गाऊन अंगावर चढवला. पण त्याची जिप काही केल्या लागेना. अख्ख्या टीमने प्रयत्न केला, पण तरीही ही जिप लागली नाही.
सनीचा हा व्हिडीओ ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला’च्या (MTV Splitsvilla) मेकअप रूममधला आहे. एका ड्रेसने तिची कशी फजिती केली, ते या व्हिडीओत पाहायला मिळतेय. ‘गाऊन परफेक्ट दिसण्यासाठी आर्मीची गरज असते,’ असे कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना दिले आहे.

सनी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या बोल्ड फोटोंची तर सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. इन्स्टाग्रावर तिचे अनेक हॉट फोटो पाहायला मिळतात. तिच्या या फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद देखील मिळतो. खरे तर सनी लिओनीच्या कामाबद्दल सगळेच जाणतात. पण तिच्या स्ट्रगलबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. आपल्या स्ट्रगलिंग काळात सनीने एका जर्मन बेकरीत काम केले होते. या बेकरीत तिला प्रचंड मेहनत करावी लागत असे. याशिवाय तिने एका टॅक्स फर्ममध्येही पार्टटाईम जॉब केला होता.

Web Title: sunny leone wardrobe mallfunction on the set of mtv splitsvilla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.