नवाजुद्दीन सोबत रोमान्स करणार सनी

By Admin | Published: November 14, 2015 02:36 AM2015-11-14T02:36:26+5:302015-11-14T02:36:26+5:30

बॉलीवूडचे ए लिस्ट स्टार्स जरी सनी लिओनसोबत काम करायला घाबरत असतील, परंतु इंडस्ट्रीत सनीने स्वत:ची अशी जागा बनवायला सुरुवात केली आहे.

Sunny to romance with Nawazuddin | नवाजुद्दीन सोबत रोमान्स करणार सनी

नवाजुद्दीन सोबत रोमान्स करणार सनी

googlenewsNext

बॉलीवूडचे ए लिस्ट स्टार्स जरी सनी लिओनसोबत काम करायला घाबरत असतील, परंतु इंडस्ट्रीत सनीने स्वत:ची अशी जागा बनवायला सुरुवात केली आहे. नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटात सनीसोबत तो रोमान्स करताना दिसणार आहे. सोहेल खानने त्याच्या आगामी चित्रपटामध्ये सनीला साइन केले आहे, ज्यात नवाजुद्दीन मुख्य भूमिकेत आहे. ही जोडी थोडी विचित्र असली तरी अशा अनेक जोड्या आहेत, ज्या मोठ्या पडद्यावर हिट झाल्या आहेत. आता चित्रपट ‘पीकू’मध्ये दीपिका पदुकोन आणि इरफान खान यांची जोडी तसेच ‘वेक अप सिड’मध्ये क ोंकणा सेन आणि रणबीर कपूर यांची जोडीही पाहा. एकीकडे सनी अडल्ड चित्रपटांसाठी प्रसिद्ध असून, नवाजुद्दीनने तर सर्व गंभीर भूमिका साकारल्या आहेत. अशा एकदम वेगळ्या जोडीला पडद्यावर एकमेकांसोबत पाहावयास
चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Sunny to romance with Nawazuddin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.