सनी शोधतोय यंग टॅलेंट

By Admin | Published: August 13, 2014 08:53 AM2014-08-13T08:53:59+5:302014-08-13T08:53:59+5:30

‘घायल रिटर्न्स’ दिग्दर्शित करण्याच्या तयारीत असलेला सनी देओल आता यंग टॅलेंटच्या शोधात आहे. या चित्रपटातील काही खास भूमिका त्याला टीनएजर्सकडून करवून घ्यायच्या आहेत.

Sunny Seeking Young Talent | सनी शोधतोय यंग टॅलेंट

सनी शोधतोय यंग टॅलेंट

googlenewsNext

‘घायल रिटर्न्स’ दिग्दर्शित करण्याच्या तयारीत असलेला सनी देओल आता यंग टॅलेंटच्या शोधात आहे. या चित्रपटातील काही खास भूमिका त्याला टीनएजर्सकडून करवून घ्यायच्या आहेत. सनी त्याच्या आॅफिसमध्ये दररोज अशा तरुणांच्या मुलाखती घेत असल्याचे कळते. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. सूत्रांनुसार सनी दररोज १०-१२ तरुण-तरुणींची भेट घेत आहे. त्यातील कमीत कमी दोन ते तीन तरुणांना तो त्याच्या चित्रपटात काम देणार आहे.’ देओल प्रोडक्शन हाऊसने मुंबईच्या काही महाविद्यालयांमध्ये याबाबत नोटीस लावली आहे. सूत्रांनुसार, फोटोग्राफी, लॉ आणि पत्रकारितेत रस असणाऱ्यांना सनी त्याच्या चित्रपटात कास्ट करणार आहे. या तरुणांचे वय १६-१८ वर्षे असावे, अशी त्याची अट आहे.

Web Title: Sunny Seeking Young Talent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.