सुपर नॅचरल दैत्याशी लढणारी सुपर ‘सामान्य’ गर्ल

By Admin | Published: August 14, 2016 03:33 AM2016-08-14T03:33:09+5:302016-08-14T03:33:09+5:30

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये सध्या ‘सुपर नॅचरल’ गोष्टींचा ट्रेंड रूजू पाहतोय. सासू-सुनेच्या ड्राम्यामध्ये आता पारलौकिक शक्तीदेखील दखल देऊ लागल्या आहेत. काहीतरी हटके देण्यासाठी

Super 'normal' girl fighting super natural monster | सुपर नॅचरल दैत्याशी लढणारी सुपर ‘सामान्य’ गर्ल

सुपर नॅचरल दैत्याशी लढणारी सुपर ‘सामान्य’ गर्ल

googlenewsNext

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये सध्या ‘सुपर नॅचरल’ गोष्टींचा ट्रेंड रूजू पाहतोय. सासू-सुनेच्या ड्राम्यामध्ये आता पारलौकिक शक्तीदेखील दखल देऊ लागल्या आहेत. काहीतरी हटके देण्यासाठी आता डेली सोप निर्माते भारतीय पुराणग्रंथांकडे वळल्याचे दिसते. नुकतीच सुरू झालेली नवी मालिका ‘ब्रह्मराक्षस’ हे त्याचे लेटेस्ट उदाहरण. क्रिस्टल डिसूझा या मालिकेची प्रमुख नायिका, तर ‘ब्रह्मराक्षसा’च्या भूमिकेत पराग त्यागी आहे. एका वर्षानंतर क्रिस्टल छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या निमित्त ‘सीएनएक्स’ने तिच्याशी केलेल्या चर्चेतून अनेक रंजक गोष्टी समोर आल्या.

‘ब्रह्मराक्षस’चा कॉन्सेप्ट काय आहे?
खूपच वेगळी कथा आहे ही. मालिकेचे कथानक कमालपुरा गावात घडते. या गावातील नववधू साजशृंगार करीत नाहीत. कारण त्यांनी जर शृंगार केला, तर त्यांच्यावर ‘ब्रह्मराक्षसा’च्या वक्रदृष्टीचे संकट कोसळते. या ब्रह्मराक्षसाला नववधंूनी सजणे आवडत नाही. रहस्यमय पारलौकिक शक्तीची दहशत संपूर्ण गावावर पसरलेली असते. भयकथेच्या मार्गाला न जाता गूढरम्यता व थरारकतेचा अनुभव देणारी ही मालिका आहे.

यात तुझी भूमिका कशी राहणार?
मी रैना नावाच्या एका साध्या-सरळ, निर्मळ मनाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. लोकांना मदत करणारी, मनमिळाऊ अशी ही रैना. जेव्हा ती एका नातेवाईक ाच्या लग्नानिमित्त कमालपुरा येथे जाते, तेव्हा तिला ब्रह्मराक्षसाबद्दल कळते. तिच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर, ती ब्रह्मराक्षसाचे रहस्य उलगडून त्याची दहशत संपविण्याचा विडा उचलते. यामध्ये तिला ऋषभ (अहम शर्मा) मदत करतो. ती कशा प्रकारे पारलौकिक शक्तींचा सामना करते, हे बघणे खरोखरच खूप एक्सायटिंग आहे.

आउटडोअर शूटिंग करण्याचा अनुभव कसा राहिला?
खरं सांगू का, एकदम अ‍ॅव्हेंचरस होता. हवेल्या आणि जंगलात जाऊन आम्ही शूटिंग केली. सेटवरील आरामदायक वातावरणातून बाहेर पडून नैसर्गिक ठिक ाणी काम करणे खरेच खूप शिकवणारा अनुभव होता. मालिका पाहताना तो तुम्हाला नक्कीच जाणवेल. प्रत्येक कलाकाराने आउटडोअर शूटिंग करण्याचा अनुभव जरूर घ्यावा, असे मला वाटते.

‘विकेंड’ सीरियल असण्यामागे काही खास कारण?
होय, जर तुम्हाला गुणवत्तापूर्ण कथा सादर करायची असेल, तर वेळ देणे खूप गरजेचे असते. त्यामुळे रोज टेलिकास्ट करण्याऐवजी आम्ही केवळ शनिवार-रविवार दाखविण्याचा निर्णय घेतला. मालिकेत मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्सचा वापर केला जात असल्यामुळेदेखील शूटिंगला वेळ लागतो.

तुझा भूत किंवा पारलौकिक शक्तींवर विश्वास आहे का?
माझा वैयक्तिकरीत्या भूत किंवा राक्षसांवर विश्वास नाही, परंतु माझा स्पिरिट्सवर (आत्मा) विश्वास आहे. जगात काही चांगले तर काही वाईट स्पिरिट्स असतात. भीतीबद्दल बोलायचे, तर मला पारलौकिक शक्तींपेक्षा जंगलात शूटिंग करत असताना साप आणि इतर कीटकांची खूप भीती वाटायची.

प्रेक्षकांसाठी प्रमुख आकर्षण काय ठरेल?
ही मालिका जरी सुपर नॅचरल गोष्टींवर केंद्रित असली, तरी यामध्ये कौटुंबिक नाट्य, प्रेमकहाणी, विनोद असे सर्वच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे डेली सोप रसिक प्रेक्षकांचे आमच्या मालिकेतून निखळ मनोरंजन होणार याचा विश्वास आहे. टीव्हीवर जे पाहतो, त्यापेक्षा काहीतरी हटके पाहायला मिळणार, म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस ही मालिका जरूर उतरेल.

- mayur.devkar@lokmat.com

Web Title: Super 'normal' girl fighting super natural monster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.