अदिती गोवित्रीकरने भारतात पिटासाठी केले होते खास फोटोशूट, पाहा त्यांचे 20 वर्षाआधीचे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:45 PM2020-01-14T12:45:35+5:302020-01-14T12:47:54+5:30
गेले अनेक दिवस ती रूपेरी पडद्यावर झळकली नव्हती . पुन्हा एकदा रसिकांचे मनोरंनज करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच हिंदी चित्रपट "कोई जाणे ना" ह्या चित्रपटात ती झळकणार आहे.
अभिनेत्री, डॉक्टर आणि आता सायकोलॉजिस्ट अदिती गोवित्रीकरने पिटा या संस्थेसोबत काम केले होते . गेल्या 20 वर्षापासून ती या संस्थेशी जोडली गेलेली आहे.आदितीचे भारतातील पिटासह काम करत आता २० वर्ष पूर्ण झाली आहेत याच निमित्ताने तिचे जुने फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्रीबरोबर ती डॉक्टर देखील आहे. डिप्रेशन आणि स्ट्रेस सारख्या आजाराबद्दल लोकांना शिक्षित करते आणि भारताच्या कानाकोप-यातील जागी जाऊन ती ह्या बद्दल प्रचार करते तसेच अदिती गोवित्रीकर प्राण्यांवर होणारे क्रूरता बद्दल आवाज उठवते.
अदिती गोवित्रीकर आणि जॉन अब्राहम पिटाचे प्रमुख कार्यकर्ता होते. स्वतः एक डॉक्टर असल्याने अदितीने प्राण्यांवर होणाऱ्या क्रूरता बद्दल आवाज उचलला आहे आणि ह्या बद्दल सोशल मीडिया वर माहिती देऊन तिच्या चाहत्यांना ह्याबद्दल माहिती देते. आणि पर्यावणामध्ये किती हानी होईल ह्याची सुद्धा जनजागृती करते. पिटा इंडिया ला २० वर्ष पूर्ण झाल्यावर अदितीने आपल्या सोशिअल मीडिया वर काही फोटोस शेर केले आहे ज्यामध्ये अभिनेत्री अदिती, जॉन अब्राहम बरोबर पोज देत असल्याचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे शाकाहारी होण्याचे आणि प्राण्यांसोबत पर्यावरणाची देखील काळजी घेण्यास आवाहन सुद्धा तिने यामाध्यमातून केले आहे.
गेले अनेक दिवस ती रूपेरी पडद्यावर झळकली नव्हती . पुन्हा एकदा रसिकांचे मनोरंनज करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच हिंदी चित्रपट "कोई जाणे ना" ह्या चित्रपटात ती झळकणार आहे. आदितीसह कुणाल कपूर आणि अमाईरा दस्तूरही झळकणार आहेत. ह्या व्यतिरिक्त अदिती "द ग्रे स्टोरीज" ह्या वेब सिरीजमध्ये किकू शारदा आणि हितेन तेजवानी सोबत दिसणार आहे.