सुपरस्टार रजनीकांतला भिकारी समजून दिली १० रुपयांची नोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2016 05:23 AM2016-08-06T05:23:52+5:302016-08-06T10:53:52+5:30
सुपरस्टार रजनीकांतचे करोडो चाहते आहते. मात्र रजनीकांत चित्रपटात जितके फॅशनेबल दिसतात त्याच उलट ख-या आयुष्यात ते अगदी साधे राहतात. ...
style="margin: 0px; padding: 0px; border: 0px; outline: 0px; vertical-align: top; color: rgb(0, 0, 0); font-family: itf_devanagarimediumfont; font-size: 15px; line-height: 26px; background-image: initial; background-attachment: initial; background-size: initial; background-origin: initial; background-clip: initial; background-position: initial; background-repeat: initial;">सुपरस्टार रजनीकांतचे करोडो चाहते आहते. मात्र रजनीकांत चित्रपटात जितके फॅशनेबल दिसतात त्याच उलट ख-या आयुष्यात ते अगदी साधे राहतात. त्यांचं हेच साधेपण त्यांच्या चाहत्यांना भावतं, त्यामुळेच त्यांच्याबद्दल फक्त प्रेम नाही आदरही व्यक्त केला जातो. मात्र रजनीकांत हे इतके साधे राहतात की, कधी कधी त्यांना ओळखणं कठीण होऊन जातं. असाच काहीसा प्रकार घडला जेव्हा रजनीकांत एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिराबाहेर विश्रांतीसाठी बसले असताना रजनीकांत यांना चक्क भिकारी समजून एका महिलेनं १० रुपयांची नोट दिली. काही दिवसांपूर्वी रजनीकांत एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर मंदिराजवळच विश्रांती घेण्यासाठी ते बसले होते. त्यादरम्यान, एक महिला तेथून जात असताना तिने रजनीकांत यांना भिकारी समजून १० रुपयांची नोट दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रजनीकांत यांनी एकही शब्द न बोलता हसतमुखाने ती नोट स्विकारली.
नोट घेतल्यानंतर रजनीकांत आपल्या गाडीकडे गेले असता, महिलेला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिच्या लक्षात आले की, ही व्यक्ती कोणी भिकारी नसून सुपरस्टार रजनीकांत आहेत. महिलेने थेट गाडीकडे धाव घेत रजनीकांत यांची माफी मागितली. यावर रजनीकांत यांनी दिलेलं उत्तर ऐकल्यावर हा माणूस एवढा मोठा सुपरस्टार का आहे हे कळते. 'जे काही झाले चांगलेच झाले. कारण, देव मला आपल्याकडून वेळोवेळी हेच सांगत आहे की, आपले पाय नेहमीच जमिनीवर असले पाहिजेत. माझी खरी ओळख ही सुपस्टार नाही, तर सामान्य माणसासारखीच आहे', असं उत्तर देऊन रजनीकांत निघून गेले.दरम्यान, ही माहिती खुद्द त्या महिलेनं दिली असून तिचे नाव डॉ. गायत्री आहे. तिने लिहिलेल्या एका पुस्तकात या संदर्भाचा उल्लेख केला आहे.