फाटलेली जीन्स बघून या सुपरस्टारची आई संतापली; म्हटले, ‘इतके कमावतोस तरी हे हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 12:40 PM2018-05-29T12:40:36+5:302018-05-29T18:19:15+5:30

भोजपुरी सिनेमामध्ये तुफान लोकप्रिय असलेल्या या सुपरस्टारचा एक मजेशीर किस्सा समोर आला आहे. त्यामध्ये तो त्याच्या फाटलेल्या जीन्सचा किस्सा सांगत आहे.

The superstar's mother was frustrated by the torn genes; He said, 'It works so much! | फाटलेली जीन्स बघून या सुपरस्टारची आई संतापली; म्हटले, ‘इतके कमावतोस तरी हे हाल!

फाटलेली जीन्स बघून या सुपरस्टारची आई संतापली; म्हटले, ‘इतके कमावतोस तरी हे हाल!

googlenewsNext
जपूरी अभिनेता दिनेश लाल यादव ऊर्फ निरहुआ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह आहे. तो त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत असतो. त्याचबरोबर त्याच्या पर्सनल लाइफशी संबंधित फोटो आणि व्हिडीओदेखील तो सातत्याने शेअर करीत असतो. दिनेश त्याच्या आईच्या खूप क्लोज आहे. तो नेहमीच आईसोबत राहता यावे म्हणून मुंबईतील त्याच्या घरी येत असतो. काही दिवसांपूर्वीच तो त्याच्या आईसोबत कॉफी शॉपमध्ये गेला होता. तेथील काही फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले. नुकताच त्याने त्याच्या आईसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये दिनेश हे सांगत आहे की, कशापद्धतीने आईने माझी फाटलेली जीन्स बघून माझी कानउघडणी केली. 

निरहुआ व्हिडीओमध्ये भोजपुरी भाषेत फाटलेल्या जीन्सचा संपूर्ण किस्सा सांगताना दिसतो. त्यात तो म्हणतो की, ‘आताच मी शूटिंगहून घरी परतलो. घरी येताच आईने म्हटले की, ‘बेटा इतका पैसा कमावतो मग फाटलेली जीन्स का घातली? हाच प्रश्न जेव्हा मी गावी गेलो होतो तेव्हा मोठ्या पापांनीही विचारला होता. तेव्हा मी उत्तर दिले होते की, ती फाटलेली नाही, डिझाइन आहे. तेव्हा त्यांनी मला म्हटले, आता तू मला शिकविणार काय? आता हाच प्रश्न माझी आई मला विचारत आहे. तिने मला विचारले की, फाटलेली जीन्स कोण घालत असते? त्यावर मी म्हटले, ‘आई ही फॅशन आहे.’
 

भोजपुरी सिनेमामध्ये जबरदस्त लोकप्रिय असलेला हा अभिनेता ‘बिग बॉस-६’मध्येही बघावयास मिळाला होता. त्यावेळी त्याने आपल्या अंदाजात घरात लोकप्रियता मिळविली होती. दिनेश लाल यादवला ढोलकी आणि हार्मोनियम वाजविण्याचा छंद होता, त्यावेळी तो त्याच्या भावांसोबत परफॉर्मन्स करत होता. पहिल्यांदा त्याने सोलो परफॉर्म केला होता. ज्याकरिता त्याला पाचशे रूपये मिळाले होते. दिनेश लाल यादव हे त्याचे खरे नाही. परंतु २००३ मध्ये त्याच्या ‘निरहुआ सटल रहे’ या म्युझिक अल्बमच्या तुफान लोकप्रियतेनंतर त्याला ‘निरहुआ’ या नावानेही ओळखले जाऊ लागले. 

Web Title: The superstar's mother was frustrated by the torn genes; He said, 'It works so much!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.