का ट्रेंड होतोय #SupportGemsofBollywood?, कोण ते अनमोल रत्न?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 03:07 PM2022-08-30T15:07:50+5:302022-08-30T15:09:45+5:30
सोशल मीडियावर बायकॉट बॉलिवूड जबरदस्त ट्रेंड होतंय. आश्चर्य म्हणजे, या सगळ्या कोलाहलात #SupportGemsofBollywood सुद्धा ट्रेंड होतोय...
बॉलिवूडवर सध्या संकटाचे ढग दाटून आले आहेत. बॉलिवूडकरचा प्रत्येक चित्रपट बायकॉट होतोय. अगदी आगामी सिनेमांवरही बायकॉटची लटकती तलवार आहे. सोशल मीडियावर बायकॉट बॉलिवूड जबरदस्त ट्रेंड होतंय. आश्चर्य म्हणजे, या सगळ्या कोलाहलात #SupportGemsofBollywood सुद्धा ट्रेंड होतोय. आता याचा अर्थ काय? ट्विटर युजर्स कोणाला अनमोल रत्नम्हणत सपोर्ट करत आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेलच. तर हे अनमोल रत्न अन्य कुणी नसून बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आहे.
Good Evening
— Shraddha P Gupta (@shraddhaPGupta) August 28, 2022
ETL:
👇👇
Sushant A Satyanweshi#SushantSinghRajput𓃵#Justice4SSR#BoycottBrahmastra#BoycottBollywood#GemsOfBollywoodpic.twitter.com/hnAvq0ZLJU
Sushant A Satyanweshi
— Shraddha P Gupta (@shraddhaPGupta) August 28, 2022
"I'm not Lost. I'm very much Alive".
~ @itsSSR 💞 @withoutthemind#Justice4SSR
My Inspiration @itsSSR 💕#SushantSinghRajput𓃵#BoycottBrahmastra#BoycottBollywood#boycottcuttputli#GemsOfBollywoodpic.twitter.com/hpI1Z8371T
सुशांत आज आपल्यात नाही. 14 जून 2020 रोजी त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूचं दु:ख चाहते अद्यापही पचवू शकलेले नाहीत. आजही असंख्य चाहते त्याच्यासाठी न्यायाची मागणी करत, सोशल मीडियावर मोहिम राबवत आहेत. बॉलिवूडबद्दल युजर्सच्या मनात जो राग आहे, तो सुद्धा सुशांतमुळे आहे. सुशांत हा बॉलिवूडमधील नेपोटिज्मचा बळी ठरला. बॉलिवूडचे काही लोक सुशांतची प्रगती पाहू शकले नाहीत. त्यांनी सुशांतचं करिअर उद्धवस्त करण्याचे प्रयत्न केलेत आणि याचमुळे त्याची हत्या झाली, असं चाहते मानतात.
NEVER FORGET..... ‼️
— 🇮🇳~M∆$T€®💢JD💥VS💥 #RolexSir 🔪🚬 (@PawanKu46684806) August 28, 2022
CBI DutyBound 2Report SSRCase#SupportGemsofBollywood#BoycottBrahmastra#BoycottbollywoodForever#BoycottPathaan 💫🔱🦋 pic.twitter.com/p4mjSrcvTN
The Love from SSRians towards SSR is the example of
— ARYA 🔱 SSRIANS💖💖💖 (@RajKArya9) August 28, 2022
Pure love🌸🌸
True Love🌸🌸
And
Respectful Love.. ♥️
Sweetheart Sushat💞
Sushant A Satyanweshi ❤#SupportGemsofBollywood#BoycottBrahmastra#BoycottBollywood#StopFamilialismInActingWorldpic.twitter.com/A1d62H5ERQ
@kamaalrkhan rip #bollywood
— jethalal ki wani (@jethalalkiwani) August 30, 2022
😂😂😂😂#BoycottBrahmastra#Boycottbollywood#GemsOfBollywood#SupportGemsofBollywoodpic.twitter.com/9Aeea9GYGX
#BoycottBrahmastra#BoycottbollywoodForever#GemsOfBollywoodhttps://t.co/4AGpTwUToy
— Uday kumar (@Udaykumar19) August 29, 2022
सुशांत आज हयात नाही, पण लोक त्याला अद्यापही विसरू शकलेले नाहीत. सध्या सुशांत सोशल मीडियावर ट्रेंड करतोय, ते त्याचमुळे #SupportGemsofBollywood या ट्रेंडसोबत अनेक चाहते सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत. त्याला सपोर्ट करत आहेत. याऊलट बॉयकॉट बॉलिवूडची मोहिम राबवत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडच्या प्रत्येक चित्रपटाला बायकॉट केलं जात आहे. याच बायकॉट ट्रेंडमुळे आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाला जोरदार फटका बसला. आमिर खानचा हा सिनेमा दणकून आपटला. अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ या सिनेमाचीही अशीच वाट लागली. इतकंच नाही, साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा व अनन्या पांडेच्या ‘लाइगर’ हा सिनेमाही फ्लॉपच्या रांगेत जाऊन बसला. आता युजर्सच्या निशाण्यावर हृतिक रोशन-सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ आहे. याशिवाय रणबीर कपूर व आलिया भटचा ‘ब्रह्मास्त्र’ हा आगामी सिनेमाही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. शाहरूख खानचा ‘पठान’ या सिनेमाला बायकॉट करण्याची तयारीही युजर्सनी चालवली आहे.