सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर विशेष भाग !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 04:59 PM2019-01-02T16:59:43+5:302019-01-02T17:14:58+5:30
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमामध्ये छोट्या सुरवीरांच्या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या प्रेमात पाडले आहे.
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमामध्ये छोट्या सुरवीरांच्या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या प्रेमात पाडले आहे... या आठवड्यामध्ये मंचावर सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या मागील पर्वाचा विजेता अनिरुध्द जोशी, तसेच शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी येणार आहेत... या गायकांनी मागील पर्वामध्ये विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रेक्षक आणि कॅप्टनसची मन जिंकली होती... अजूनही महाराष्ट्र यांची गाणी विसरलेला नाही.
या भागामध्ये अंतिम फेरीमध्ये पोहचलेल्या सहा स्पर्धकांबरोबरच शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी आणि अनिरुध्द जोशी यांनी देखील गाणी सादर केली आहेत... सई जोशीने अधीर मन झाले.. अंशिका चोणकरने गुलाबाची कळी... मीरा निलाखे आओ ना, चैतन्य देवढे याने खंडेरायाच्या लग्नाला... स्वराली जाधव हिने माही रे तर उत्कर्ष वानखेडे याने फिर ले आया हे गाणे सादर केले ... या गाण्याच्या दरम्यान उत्कर्षला त्याचे अश्रू अनावर झाले आणि त्याची आई भाऊक झाली... याचबरोबर यांनी डुएट गाणी देखील सादर केली आहेत... मागच्या पर्वातील प्रेक्षकांच्या लाडक्या स्पर्धकांनी त्यांची सगळ्यात लोकप्रिय गाणी या मंचावर पुन्हाएकदा सादर केली... ज्यामध्ये शरयू दातेने अवघा रंग, प्रेसेनजीत कोसंबीने पत्रास कारण कि, तर अनिरुध्द जोशीने पर्दा हे पर्दा ही गाणी सादर केली... शरयू दातेने सादर केलेल्या गाण्याने शाल्मलीचे मन जिंकले. मॉनिटरने मंचावर मिठाई वाटली कारण, हा सिझन प्रेक्षकांना खूप आवडत आहे... तसेच स्पृहाने लहान मुलांच्या आवाजात एक निबंध वाचला जो वैभव जोशी यांनी लिहिला आहे.