सूर नवा ध्यास नवाच्या ऑडिशन्सना मिळतोय चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 11:31 AM2018-07-09T11:31:25+5:302018-07-09T11:33:16+5:30

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स नुकत्याच गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी येथे पार पडल्या. कार्यक्रमाच्या या ऑडिशन्सला रत्नागिरीमधील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

sur nava dhyas nava auditions getting good response | सूर नवा ध्यास नवाच्या ऑडिशन्सना मिळतोय चांगला प्रतिसाद

सूर नवा ध्यास नवाच्या ऑडिशन्सना मिळतोय चांगला प्रतिसाद

googlenewsNext

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. या सिझन मध्ये सहभागी झालेल्या सगळ्याच स्पर्धकांचे आवाज खूपच छान होते. या कार्यक्रमाचा पहिला सिझन संपल्यानंतर या कार्यक्रमाचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची उत्सुकता सगळयांना लागली होती. या कार्यक्रमाच्या फॅन्स साठी एक गुड न्युज आहे. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच सुरु होणार असून कार्यक्रमाच्या ऑडिशन्सना सुरुवात देखील झाली आहे. 

कलर्स मराठी वरील सूर नवा ध्यास नवा – Little Champs या कार्यक्रमाचा शुभारंभ ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत आपल्या सगळ्यांचा लाडका अवधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे सध्या गुलदसत्यात ठेवण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे सूत्रसंचालन तेजश्री प्रधानने केले होते. होणार सून मी या घरची या कार्यक्रमामुळे तेजश्री नावारुपाला आली. तिने ती सध्या काय करते या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. पण सूर नवा, ध्यास नवा या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझन मध्ये तेजश्री नव्हे तर एका दुसऱ्याच कलाकाराची वर्णी लागली आहे. ही कलाकार कोण असणार याची लवकरच घोषणा केली जाणार आहे. 

या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स नुकत्याच गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी येथे पार पडल्या. कार्यक्रमाच्या या ऑडिशन्सला रत्नागिरीमधील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या रत्नागिरी केंद्रावर पार पडलेल्या निवड चाचणीतून मुंबईतील मेगा ऑडिशन्ससाठी पाच स्पर्धक निवडण्यात आले. आदित्य पंडित, हर्षाली कालेकर, श्रेया भागवत, सृष्टी तांबे आणि कुणाल साळवी अशी त्यांची नावे आहेत. 

या ऑडिशन्समध्ये जवळपास २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आता ऑडिशन्स कोल्हापूर मध्ये रंगणार आहे. सूर नवा ध्यास नवाचे मागील पर्व हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले त्या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. हे पर्व छोटे सुरवीर गाजवणार हे नक्की. या बालगोपाळांचे सुरेल गाणं ऐकायला संपूर्ण महाराष्ट्र आतूर आहे. 
 

Web Title: sur nava dhyas nava auditions getting good response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.