'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मधील 'सुरैया' गाणं आऊट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 04:55 PM2018-10-24T16:55:32+5:302018-10-24T17:00:51+5:30
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमातील 'वाश्मल्ले' गाणे रिलीज झाल्यानंतर आज सुरैया हे गाणं रसिकांच्या भेटीला आलेले आहे. सुरैया गाण्यात कॅटरिनाच्या डान्सचा जलवा पाहायला मिळतो आहे.
ठग्स ऑफ हिंदुस्तान सिनेमातील 'वाश्मल्ले' गाणे रिलीज झाल्यानंतर आज 'सुरैया' हे गाणं रसिकांच्या भेटीला आलेले आहे. सुरैया गाण्यात कॅटरिनाच्या डान्सचा जलवा पाहायला मिळतो आहे. विशाल ददलानी आणि श्रेया घोषाल यांनी हे गाणं गायले आहे तर अजय अतुल यांनी संगीत दिले आहे.
Doing away with the practice of showing *the entire song* before its release, Aamir Khan and YRF have decided to publicise *a mere glimpse* of the songs of #ThugsOfHindostan... First #Vashmalle. Now #Suraiyya... Welcome move, indeed... Link: https://t.co/4yczdos9L3
— taran adarsh (@taran_adarsh) October 24, 2018
आमिर व अमिताभच्या या चित्रपटाची कथा ठग आणि इंग्रजांच्या संघर्षावर आधारित असेल, असा कयास बांधला जात आहे. चित्रपटातील ‘ठग्स’ ईस्ट इंडिया कंपनीविरोधात लढणा-या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या रूपात दिसतील, असाही एक अंदाज आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर, अमिताभ यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटानच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये याची काळजी घेतली आहे. या चित्रपटाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण माल्टा येथे करण्यात आले होते. या चित्रपटातील फँटसी, अॅक्शन हे प्रेक्षकांना खरेखुरे वाटावे यासाठी चित्रपटाच्या टीमने प्रयत्न केले आहेत. आजवर बॉलिवूडच्या इतिहासात कोणत्याच आऊटडोर चित्रीकरणाला इतका पैसा वापरण्यात आलेला नव्हता असे म्हटले जाते.