बहिणींची भावाला मिठी, आत्याने घेतला मुका! सूरजच्या कुटुंबाचं प्रेम बघून सर्वांचे डोळे पाणावले, नवा प्रोमो बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 03:35 PM2024-09-27T15:35:24+5:302024-09-27T15:37:17+5:30

गोलीगत धोका फेम सूरज चव्हाणच्या कुटुंबाला भेटून सर्वांचेच डोळे पाणावले (suraj chavan, bigg boss marathi 5)

suraj chavan family come in bigg boss marathi 5 house emotional promo viral | बहिणींची भावाला मिठी, आत्याने घेतला मुका! सूरजच्या कुटुंबाचं प्रेम बघून सर्वांचे डोळे पाणावले, नवा प्रोमो बघाच

बहिणींची भावाला मिठी, आत्याने घेतला मुका! सूरजच्या कुटुंबाचं प्रेम बघून सर्वांचे डोळे पाणावले, नवा प्रोमो बघाच

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. या सीझनमध्ये सध्या फॅमिली वीक सुरु आहे. काल अभिजीत, धनंजय, जान्हवी आणि वर्षा उसगांवकर यांच्या कुटुंबातील सदस्य भेटायला आले. आज उर्वरीत सदस्यांचे कुटुंब त्यांना भेटायला येणार आहेत. यापैकी सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे सूरज चव्हाणची. सूरजचं कुटुंब त्याला भेटायला आल्याचा नवीन प्रोमो कलर्स मराठीने शेअर केलाय. सूरजच्या कुटुंबाला भेटून सर्वांनाच आनंद झालेला दिसतोय.

सूरजच्या फॅमिलीला भेटून सर्वांचेच डोळे पाणावले

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो कलर्स मराठीने शेअर केलाय. या प्रोमोत सूरजची आत्या आणि बहिणींची घरात एन्ट्री होते. दरवाजा उघडताच सर्व आत येतात. सूरज दारासमोरच उभा असतो. नंतर बहिणी आणि आत्या सूरजला मिठी मारतात. आत्या सूरजचा मुका घेते. सूरज पुढे सर्वांना घर दाखवतो. बहिणी आणि आत्याच्या निखळ प्रेमात सूरज न्हाऊन निघतो. सूरजच्या कुटुंबाला बघून सर्वांचेच डोळे पाणावतात. 


बहिणीने सूरजला सांगितली मनातली इच्छा

पुढे प्रोमोत बघायला मिळतं की सूरजच्या बहिणी आणि आत्या घरात फेरफटका मारतात. "तुझ्यामुळे आज इथपर्यंत यायला भेटलंय आम्हाला", असं सूरजची बहीण त्याला म्हणते. पुढे सर्वजण गार्डन एरियात येतात. निक्की सूरजच्या फॅमिलीला मिठी मारते. सर्वजण तिकडे एका बँचवर बसतात. सूरजच्या  फॅमिलीशी सर्व गप्पा मारतात. सूरजच्या फॅमिलीने दिलेलं इतकं निखळ, निर्मळ प्रेम बघून वर्षाताई आणि घरातील इतर सर्वांचे डोळे पाणावलेले दिसतात. अशाप्रकारे आज सूरजचं कुटुंब घरात येताना दिसणार आहे.

Web Title: suraj chavan family come in bigg boss marathi 5 house emotional promo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.