सूरजने जिंकलेली ट्रॉफी पॅडीच्या हातात दिली! अभिनेता म्हणाला- "महाराष्ट्रातील संपूर्ण रसिक मायबाप आज.."

By देवेंद्र जाधव | Published: October 7, 2024 09:50 AM2024-10-07T09:50:04+5:302024-10-07T10:40:11+5:30

सूरज चव्हाणने विजयी होताच जिंकलेली ट्रॉफी पॅडी कांबळेच्या हातात दिल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत (suraj chavan, bigg boss marathi 5)

काल संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली. कारण सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा विजेता झाला

सूरज विजयी होताच सर्वांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. याशिवाय रितेश देशमुखने त्याच्यासोबत खास सेल्फी काढला

अभिजीत सावंतला दुसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले. सूरज आणि अभिजीतसोबत रितेशने झक्कास सेल्फी घेतला

सूरज चव्हाण जिंकताच व्हॅनिटी वॅनमध्ये जाऊन पॅडी कांबळेने त्याची खास भेट घेतली. यावेळी सूरजने ट्रॉफी पॅडीच्या हातात दिली

पॅडीने सूरजची ट्रॉफी हातात घेऊन त्याच्यासोबत खास फोटो काढला. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता

सूरज चव्हाणने जिंकलेली ट्रॉफी उचलताच पॅडीच्या आनंदाला उधाण आले होते. बिग बॉसच्या घरात अनेक छोट्या छोट्या गोष्टी पॅडीने सूरजला समजावल्या होत्या.

"या चेहऱ्यांवर आनंद आणि समाधान देणाऱ्या महाराष्ट्रातील संपूर्ण रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार!", अशी खास प्रतिक्रिया पॅडीने दिली आणि सूरजची गळाभेट घेतली