'..तर तो ड्रग्सच्या आहारी गेला असता'; विवेकला काम मिळावं यासाठी वडिलांनी झिजवले निर्मात्यांचे उंबरठे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 03:01 PM2024-06-07T15:01:01+5:302024-06-07T15:01:57+5:30
Suresh oberoi: सलमानसोबत भांडण झाल्यानंतर विवेकच्या करिअरवर त्याचा कसा परिणाम झाला हे सुरेश यांनी सांगितलं.
'साथिया' या सिनेमातून तुफान लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे विवेक ओबेरॉय (vivek Oberoi). करिअरच्या सुरुवातीला विवेकने अनेक सुपरहिट सिनेमा दिले. परंतु, एका ठराविक काळानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. अलिकडेच विवेकचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेता सुरेश ओबेरॉय यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विवेकला इंडस्ट्रीत लॉन्च करण्यापूर्वी कशा प्रकारे अडचणी आल्या. त्यांनी कशा प्रकारे निर्मात्यांची दारोदारी जाऊन भेट घेतली हे सांगितलं.
सुरेश ओबेरॉय यांनी बॉलिवूड हंगामाला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विवेकला कलाविश्वात लॉन्च करतांना अनेक संकटांचा सामना करावा लागला असं ते म्हणाले. विशेष म्हणजे ते लोकप्रिय अभिनेता असूनही त्यांना निर्मात्यांच्या ऑफिसचे उंबरठे झिजवावे लागले.
विवेक लहान असल्यापासून मी त्याला अभिनयाचं ट्रेनिंग देत होतो. मी त्याच्याकडून स्टेज शो करुन घेतले. त्याव्यतिरिक्त त्याला FTII मध्ये माझ्या सिनिअर्ससोबत कोर्सही करायला लावला. विवेकच्या करिअरसाठी मी सुद्धा स्ट्रगल केला आहे. मी त्याचे फोटो घेऊन तासन् तास निर्मात्यांच्या घराबाहेर उभा रहायचो. तो काळ माझ्यासाठी सेकंड स्ट्रगलसारखा होता. त्या ऑफिसमध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचंही ऑफिस होतं आणि त्यांनीच विवेकला कंपनी सिनेमात काम करायची संधी दिली", असं सुरेश ओबेरॉय म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "सलमान खानसोबत झालेल्या मतभेदानंतर विवेकच्या करिअरमध्ये खूप चढउतार आले. विवेकच्या जागी जर दुसरा कोणी असता तर तो ड्रग्स किंवा दारुच्या आहारी गेला असता. प्रत्येक जण त्याच्या विरोधात गेला होता. इतकंच नाही तर मीडिया आणि इंडस्ट्रीतील लोकही त्याच्या विरोधात होते. ज्यावेळी लोकांना खूप लवकर यश मिळते त्यावेळी ते त्यांचे जूने दिवस विसरुन जातात."