सूर्या आणि शिवाची भेट होणार, बालपणीचे मित्र येणार एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 03:42 PM2024-11-26T15:42:37+5:302024-11-26T15:43:16+5:30
Shiva And Lakhat Ek Amcha Dada : झी मराठीची मालिका 'शिवा' आणि 'लाखात एक आमचा दादा'चा`होणार महासंगम.
झी मराठीची मालिका 'शिवा' (Shiva) आणि 'लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Amcha Dada)चा`होणार महासंगम. सूर्यादादाची लाडकी बहीण तेजश्री लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे आणि घरात उत्साहचा माहोल आहे. पण दादावर तेजूच्या लग्नाच्या पैश्यांची जुळवाजुळव करायची जबाबदारी आहे. तेजूच्या लग्नाची पत्रिका छापलेली आहे आणि पहिली पत्रिका देवाला अर्पण करण्यासाठी म्हणून सूर्या, तुळजाला घेऊन मंदिरात पोहचला आहे. इकडे शिवा तिच्या आजीच्या जमिनीचे काम करण्यासाठी तिच्या आजीला घेऊन गुळूंब गावी आली आहे. तिच्यासोबत आशु, दिव्या आणि मांजा आहेत. तर दुसरीकडे जगदीश शत्रूकडे येऊन आजीच्या जमिनीची डील करून पैसे घेऊन निघून जातो.
सूर्या तुळजा मंदिरात आहेत तिथे काही गुंड तुळजाची छेड काढतात. सूर्या मंदिरातून बाहेर निघाल्यावर तुळजाला एके ठिकाणी थांबवून मंदिराजवळ येऊन गुंडाना धडा शिकवतो. गुंड पळून जात असताना सूर्याही त्यांच्या मागे आहे. एका ठिकाणावर येऊन हेच गुंड पुन्हा सूर्यावर हल्ला करतात. सूर्याच्या शोधात तुळजादेखील तिकडे येते. त्याच क्षणी एक जण तुळजावर हल्ला करतो आणि तिला ब्रिजवरून खाली टाकण्याचा प्रयत्न करतो. इकडे शिवा चहा प्यायला थांबली असतानां ती हे सर्व पहाते आणि जराही जीवाची पर्वा न करता तुळजाला वाचवणार आहे.
सूर्या सगळ्यांना घेऊन त्याच्या घरी येतो. यावेळी सूर्याच्या घरी सर्वांचे जंगी स्वागत होते. दुसरीकडे शिवा तलाठी कार्यालयात जाताच तिला कळतं की आजीची जमीन कुणीतरी जालिंदर नावाच्या व्यक्तीने बळकावली आहे. दुसऱ्या दिवशी तेजश्रीच्या लग्नासाठी सवाष्ण पूजनाचा कार्यक्रम असल्याने जालिंदरकडे शिवाची आजी आहे. जालिंदर आपली स्वतःची जमिन मागण्यासाठी आलेल्या बाई आजीचा भरपूर अपमान करतो ही गोष्ट शिवाला समजताच ती तडक जालिंदरला धडा शिकवायला निघते. इकडे जालिंदर एक खेळी खेळतो शिवाला टक्कर द्यायला सूर्याला बोलावतो.
हा महासंगम खूपच असणार धमाकेदार
शिवा म्हणजेच पूर्वा कौशिकने आपला अनुभव व्यक्त करताना सांगितले, "हा महासंगम खूपच धमाकेदार असणार आहे, दादा आणि शिवा लहानपणीचे मित्र आहेत हा विचारच भन्नाट आहे. ज्याप्रकारे हा महासंगम शूट होत आहे ते जेव्हा प्रेक्षक बघतील त्यांनाही हेच वाटेल. मी नितीश चव्हाण पहिल्यांदा काम करत आहे. तो साताऱ्याचा आणि मी मुंबईची, जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मला सर्वात जास्त जी गोष्ट आवडली किंवा मी आकर्षित झाले ती म्हणजे साताऱ्याचा लेहजा जो नितीश आणि सूर्यादादा मध्ये आहे. दोन मालिकांचे कलाकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा शेड्युल हेक्टिक तर असणारच. आम्ही चर्चा केली अॅक्शन सीन कसे करायचे आणि ते शूट करताना ही मला खूप कमाल वाटले. मी खरंच पहिल्यांदा आयुष्यात हे पाहिलं आणि केलं आहे. मला आशा आहे कि प्रेक्षकांनाही तितकीच मज्जा येईल."