आता सुशांत-अंकिताचे ब्रेकअप?

By Admin | Published: March 25, 2016 10:04 AM2016-03-25T10:04:56+5:302016-03-25T10:07:21+5:30

'पवित्र रिश्ता' या मालिकेदरम्यान सूत जुळल्यानंतर गेल्या ६ वर्षांपासून एकत्र असलेले लव्हबर्ड्स सुशांत राजपूत-अंकिता लोखंडेचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे.

Sushant-Ankita's breakup now? | आता सुशांत-अंकिताचे ब्रेकअप?

आता सुशांत-अंकिताचे ब्रेकअप?

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - 'पवित्र रिश्ता' या मालिकेदरम्यान सूत जुळल्यानंतर गेल्या ६ वर्षांपासून एकत्र असलेले लव्हबर्ड्स सुशांत राजपूत - अंकिता लोखंडे यांच्या नात्यातही वितुष्ट आले असून त्या दोघांचेही ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. बॉलिवूडमधील अनेक कपल्समध्ये या वर्षात दुरावा निर्माण झाला. प्रथम रणबीर-कतरिना, त्यानंतर फरहान-अधुना यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या ताज्या असतानाच आता अभिनेता सुशांत सिंग राजपूत व टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचेही ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.
२००९ पासून सुशांत व अंकिता एकत्र असून गेल्या काही वर्षांपासून ते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये आहेत. इंडस्ट्रीतील क्यूट कपल असलेल्या या दोघांमध्ये खटके उडत असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती, मात्र त्यांनी कधीच या विषयावर मौन सोडले नाही. त्यानंतर अनेकवेळा ते पार्ट्यांमध्ये एकत्र दिसल्याने त्यांच्या ब्रेकअपच्या अफवाही हवेत विरल्या.ट
मात्र आता पुन्हा त्यांच्यात सर्व काही ठीक नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.  सुशांत सध्या भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावरील चित्रपटात व इतर कामांमध्ये बिझी आहे. त्यामुळे त्याला व अंकिताला पुरेसा वेळ एकत्र घालवता येत नसून हेच त्यांच्यात खटके उडण्याचे मुख्य कारण होते. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच सुशांत व अंकिताने सामंजस्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला असून ६ वर्षांपासून एकत्र असलेल्या या कपलच्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत. 

Web Title: Sushant-Ankita's breakup now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.